नागपूर : जिल्ह्यात रमजान
ईदनिमित्त 19 जूनपासून रोजाला सुरवात झाली. शनिवारी (ता. 18) चंद्रदर्शनानुसार
रमजान ईदची सांगता होईल. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त राहणार
आहे. जिल्ह्यात एक पोलिस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, 11 सहायक पोलिस/ पोलिस
उपनिरीक्षक, 171 पोलिस कर्मचारी, 2 आर. सी. पी. पथक, 400 गृहरक्षकदल, एसआरपीफचे एक
प्लाटून असा बंदोबस्त राहील. इदनिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मशीद, दरगाह,
ईदगाह येथे सामूहिकरीत्या नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात. नमाजचे पठणसाठी होणारी
गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. कन्हान, सावनेर, रामटेक, जुनी
कामठी, कामठी, कुही, खापरखेडा, देवलापार, भिवापूर, बोरी, कन्हान, उमरेड, वेलतूर
येथे हा बंदोबस्त राहील. संवेदनशील ठिकाणे, मिश्र वस्ती, गर्दीचे ठिकाणे, प्रमुख
चौकात गस्त घालण्यात येईल.



