12 Aug 2017

सकाळ विदर्भ


  • आज दिवसभरातील बातम्यांवर एक नजर
  • - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) "लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम'अंतर्गत गुरुवारी आणि शुक्रवारी नागपूर जिल्हा आणि शहरातील चौदा महाविद्यालयात "यिन' प्रतिनिधीसाठी निवडणुका पार पडल्या. यावेळी नेमके कोण निवडून येणार याची उत्कृंठा प्रत्येकच उमेदवाराला लागली असताना, शनिवारी (ता.12) सकाळच्या शहर कार्यालयात पार पडलेल्या मतमोजनीनंतर निकालाची घोषणा करण्यात आली.
  • - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्याने तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ही थरारक घटना घडली. ममता एकनाथ कोहळे (वय 24) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव एकनाथ काशिनाथ कोहळे (वय 27) आहे.
  • - स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी एनडीएमध्ये राहण्याबाबत 15 दिवसात निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपासून भाजपासोबत असलेले राजू शेट्टी यांनी अनेकदा केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकारची कोंडी करणारी भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना शेट्टी यांनी ही माहिती दिली.
  • - चंद्रपूरच्या तरुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याच्या नावे बॅंक अधिका-याने गैरव्यवहार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. ऍक्‍सीस बॅंकेच्या अधिका-यांसह चौघांविरुद्ध सिताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
  • - अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना गोंदियातील खळबंदा येथे काल शुक्रवारी घडली.
  • - श्रीकृष्ण शोभयात्रेच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद चीनच्या वस्तूंचा विरोध करणार आहे. यंदा नागपुरातून निघणाऱ्या शोभायात्रा स्वदेशीवर आधारित झॉकी असतील.
  • नागपूरमध्ये मॉडेल मिलची भिंत पडली, दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी घडली.
  • - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्‍यातील पिंपळगाव येथे वैनगंगा नदीच्या पात्रात युवकाचा मृतदेह आढळला.
  • उद्या रविवारी, 13 ऑगष्ट रोजी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात जागतिक अवयवदान दिन साजरा होईल. सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित राहणार आहेत.
  • सविस्तर बातम्यांसाठी वाचा सकाळ

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates