पत्नीच्या भावास विटेने मारले, भंडारा
मार्गावरील झुडपातून ताब्यात
मौदा, ता. 19 : मौदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रामटेक न्यायालयातून शनिवारी (ता. 11) पसार झालेला आरोपी राजकुमार दिवाळू सरोदे (वय 32) याला भंडारा मार्गावरून ताब्यात घेण्यात यश आले.
बोरगाव येथे पाच जुलै रोजी राजकुमार सरोदे (रा. नगरधन) याचे पत्नीसोबत पैशाच्या कारणावरुन भांडण झाले. तेव्हा पत्नीचा भाऊ चंद्रशेखर रमेश पडोळे (वय 30) हा भांडण सोडविण्याकरीता आला. तेव्हा राजकुमारने त्यास शिवीगाळ करुन "तु कशासाठी आला.' असे म्हणत अंगणात असलेला विटेचा तुकडा हातात घेवून चंद्रशेखरच्या डोक्यावर मारला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमीची पत्नी पुष्पकला चंद्रशेखर पडोळे यांनी यांनी पोलिसात तक्रार दिली. या गुन्ह्यातील आरोपी राजकुमारला मौदा पोलिसांनी 11 जुलै रोजी अटक करून न्यायालयात नेले. मौदा येथील न्यायाधीश रजेवर असल्याने त्याला रामटेक येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. तेथून पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार झाला होता. 18 जुलै रोजी सायंकाळी तो ठाणा (पेटोलपंप) येथे आढळल्याची गुप्त माहिती मौदा पोलिसांना मिळाली. मौदा पोलिस ताफ्यासह आरोपीचे शोधार्थ रवाना झाले. भंडारा, लाखनी परिसरामध्ये आरोपीचा शोध घेण्यात आला. शोध घेत असताना रात्री दोनच्या सुमारास खात रस्त्यावरील रेल्वे रुळाजवळ आरोपी पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहताच पुन्हा तो पसार झाला. याकामी भंडारा येथील रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांची मदत घेऊन त्या परिसरामध्ये शोध घेण्यात आला. तेव्हा तो एका झुडपातील गटारामध्ये दडलेला दिसला. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. फरार झाल्याप्रकरणी त्याचेवर कलम 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक एस. एम. तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र तायडे, नायक पोलिस हवालदार अरुण कावळे, शिपाई राजेश गांगवे, विनोद मरस्कोल्हे, विजय सिन्हा यांनी केली.