मतदानयंत्रे उमेदवाराच्या नावासह केले "सेट'
कामठी, ता. 1/08 : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, गुरुवारी (ता. 30) तहसील कार्यालयाच्या सभागृहात संबंधित उमेदवारांसमोर मतदानयंत्रे "सेट' करण्यासाठी प्रक्रिया तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तालुक्यातील 27 प्रभागांतील 74 सदस्यांच्या निवडीकरिता एकूण 181 उमेदवार रिंगणात आहेत.
पारदर्शक मतदानप्रक्रिया व्हावी, यासाठी तहसील कार्यालयातर्फे तालुक्यातील सर्व उमेदवारांच्या समक्ष मतदानयंत्रे सील केली. यात संबंधित उमेदवारांसमोर त्याचे नाव व चिन्ह लावून मतदानयंत्र "सील' केले. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीतील एकूण 31 प्रभागांतील 87 सदस्यांकरिता निवडणूक होणार होती. परंतु, पावनगावमधील 8, लोणखैरीमधील 3 व भामेवाडातील 2 असे एकूण 13 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आता उर्वरित 27 प्रभागांतील 74 सदस्यांच्या निवडीसाठी 4 ऑगष्टला मतदानप्रक्रिया पार पडेल. यासाठी 181 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 38 मतदानकेंद्रावर मतदानप्रक्रिया होणार असून, यासाठी 20 हजार 895 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यासाठी 180 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कामठीत महिलेकडून साडेचार लाख लुटले
स्टेट बॅंकेसमोरील घटना : भरदिवसा दुचाकीरून आले चोरटे, पाठलाग करताना महिला जखमी
कामठी, ता. 20 : गरूड चौकस्थित स्टेट बॅंक ऑफ इंडिया येथून पैसे काढून जात असलेल्या महिलेकडून अज्ञात दुचाकीस्वारांनी साडेचार लाखांची रक्कम हिसकावून पसार झाले. ही घटना सोमवारी (ता. 20) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
येरखेडा निवासी नूतनदेवी राजेश पासवान (वय 35) ही महिला सोमवारी (ता.20) दुपारी बारा वाजताच्या सुमारास कामठीच्या गरूड चौक स्थित स्टेट बॅंकेतून 4 लाख 50 हजारांची रक्कम काढून कपड्याच्या थैलीमध्ये घेऊन जात होती. कॅन्ट्रोमेंटस्थित पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट करायचे होते. मार्गाने जात असताना मागून दुचाकीवरून दोघेजण आले. महिलेला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर तिच्या हातातील थैली हिसकावून नागपूरच्या दिशेने पसार झाले. लगेच महिलेने आरडाओरड केली. परिसरात उभ्या एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून त्यांचा पाठलाग केला. परंतु, घाबरलेल्या महिलेचे संतुलन बिघडल्याने खापरखेडा टी पॉइंटवर महिला गाडीवरून खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कॅन्ट्रोमेंट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कामठीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश कंतेवार, पोलिस निरीक्षक उत्तम मुळक, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील घटनास्थळी दाखल झाले. वायरलेसद्वारे घटनेची माहिती पाठवून जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. महिलेने दिलेल्या माहितीवरून दोघेही काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आले. चालकाने काळ्या रंगाचे तर मागे बसलेल्याने निळ्या रंगाची टी शर्ट घातले होते. दोघांचाही वर्ण सावळा असून, सडपातळ बांधा आहे. पोलिसांनी बॅंक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. ही घटना बॅंक बाहेरील असल्याने आत व बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात येत आहेत.
सीताराम मंदिरात चांदीच्या मुकुटांची चोरी
कामठी, ता. 20 : गुडओली चौकातील सीताराम मंदिरातील सात मूर्तींचे चांदीचे मुकुट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेले. ही घटना सोमवारी (ता. 20) दुपारी घडली.
सीताराम मंदिरातील पुजारी सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पूजापाठ करून मंदिराचे दार नेहमीप्रमाणे बंद करून आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी या मंदिरातील सात मूर्तींचे चांदीचे मुकुट चोरून नेले. मंदिराचा पुजारी जेव्हा पाच वाजताच्या सुमारास मंदिराचे दार उघडण्याकरिता आला तेव्हा दार उघडे दिसले व मंदिरातील सर्व सातही मूर्तींचे चांदीचे मुकुट चोरीस गेले होते. ते अंदाजे दीड ते दोन किलो वजनाचे असून, त्यांची किमत अंदाजे 70 ते 80 हजार रुपये आहे. त्यांनी लगेच घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना व स्थानिक जुने कामठी पोलिसांना देण्यात आली. जुनी कामठी पोलिस ठाण्याचे ठाणेदार जयेश भांडारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
परिचारिकांच्या आरोग्याची हेळसांड
येरखेडा : रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. परिचारिकांना आरोग्य विम्याचे संरक्षण नाही. त्यांना विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची सेवा बजावताना एखादा आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी परिचारिकांकडून केली जात आहे. स्वाइन फ्लू, क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजार जडलेल्या रुग्णांची सेवा करताना परिचारिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारे कोणतेच संरक्षण नाही. डॉक्टर व रुग्ण यांच्यात परिचारिका हाच मुख्य दुवा असतो. प्रत्येक रुग्णाची योग्य काळजी घेणे हे परिचारिकेचे कर्तव्य असते. परिचारिकेकडून कोणतीही हलगर्जी झाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे परिचारिकांना कायम सतर्कराहावे लागते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती मोठे संकट कोसळले तरी रुग्णसेवा करण्यापासून त्या कधीच मागे पाऊल टाकत नाही. मात्र, या परिचारिकांना आजाराची लागण झाल्यास त्यांना कोणतेही आरोग्यविषयक संरक्षण शासनातर्फे अद्याप देण्यात आलेले नाही. या परिचारिकांना संसर्गजन्य आजारांची लागण झाल्यास जबाबदारी कुणाची, याचे उत्तर सरकारकडे नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या एखाद्या परिचारिकेला मोठ्या आजाराची लागण झाल्यास तिच्यावरील उपचाराचा खर्च कोण करणार? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. या परिचारिकांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी परिचारिकांकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक रुग्णालयांत परिचारिकांना आठ तास ड्यूटी करावी लागते. सतत उभे राहून काम केल्याने अनेक परिचारिकांना गुडधे व सांधेदुखीचा आजार जडत आहे. परिचारिकांना कामाच्या ठिकाणी सह-कर्मचारी, वरिष्ठ डॉक्टरांकडून आणि रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत असला तरी प्रत्यक्षात परिचारिकांना केवळ आठ किंवा नऊ हजारच विद्यावेतन मिळते. मागील दहा वर्षांत विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली नाही. तसेच एक ते दीड वर्षाने परिचारिकांच्या बदल्या होत असल्याने संबंधित करारात सेवा सुरक्षेचा किंवा सेवेत समाविष्ट करण्याबाबत कोणताही उद्देश नाही. त्यामुळे अनेकदा परिचारिकांना पदोन्नती मिळण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.