श्री चक्रधर स्वामींचे पदस्पर्श
मौर्य, वाकाटकांची सत्ता
ओंकाररूपी रामधाम, मॅंगनीज खाणीसाठी प्रसिद्ध
------------
मनसर हे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले गाव. येथील पुरातन इमारतींवरील कलाकुसर लक्षवेधक आहे. प्राचीन तलाव "रत्नतलाव' तसेच "मनिकालमुंड तीर्थ' नावाने ओळखला जातो. तलावाच्या नावावरून "मनसर' असे नाव पडल्याचे सांगितले जाते. सातवाहनांच्या काळात "प्रवरपूर' असे नाव होते. येथील मोठ्या डोंगरावर 1988-89मध्ये पुरातत्त्व विभागाने उत्खनन केले होते. त्यात वाकाटककालीन मंदिरांचे अवशेष आढळले होते. येथील वास्तूंचे बारकाईने निरीक्षण केल्यास भिंतींवर प्राचीन कलाकुसर केलेली दिसते. राष्ट्रीय महामार्गावर असूनही गाव विकासापासून वंचित आहे. मॅंगनीज खाणीसाठी प्रसिद्ध; मात्र येथे एकही उद्योग नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने गावात औदासीन्याची छाया पसरली आहे. राजकारण्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे.
चक्रधर स्वामींचे वास्तव्य
महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींचे काही काळ येथे वास्तव्य होते. दर चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने या गावाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. महानुभावपंथी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात.
वाकाटक संस्कृती
नागपूरजवळ असलेल्या मनसर येथे सातवाहनकालीन शहर होते. येथील उत्खननात मंदिरे, दुकाने, मूर्ती आणि राजवाडा सापडला. वाकाटक राजा प्रवरसेनचे "प्रवरपूर' नावाचे राजमहल व "प्रवरेश्वर' हे विशाल मंदिरही होते. इ. स. 250मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या आधिपत्याखाली होता. सातवाहनांच्या काळात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ. स. 350मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झाले, असे सांगितले जाते. काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे "शाकुंतल'. कविकुलगुरू कालिदासांनी हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले. मनसर येथे उत्खननात 2 हजार 766 मूर्ती सापडल्या. वाकाटक संस्कृतीतील मूर्तींचे आणि अन्य वास्तूंचे जतन करून संग्रहालय तयार करावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. 1988 ते 2008 या कालावधीत अनेक मूर्ती आणि वास्तू येथे सापडल्या. मूर्ती, वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षण न झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. पाणी आणि उष्णतेचा मारा होत असल्यामुळे मूर्तींचा रंग काळा पडला आहे. काही ठिसूळ झाल्या आहेत. आता येथे जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
रामधाम
रामटेकच्या रमणीय परिसरात फिरण्याचा आनंद निराळाच असतो. त्यात मनसर येथील रामधामाच्या सौंदर्याची भर पडली आहे. रामटेकला जाणारा पर्यटक अथवा भाविक मनसरच्या ओंकारमयी "रामधाम' येथे भेट दिल्याशिवाय परत येत नाही. मनसर येथे सहा एकरांच्या भव्य परिसरात हे रामधाम साकारण्यात आले आहे. या ठिकाणी रामायणात उल्लेख असलेल्या चित्रकूट पर्वताची प्रतिकृती लक्ष वेधून घेते. सिमेंट आणि लोखंडाचा वापर करून उभारण्यात आलेला हा तीन मजली चित्रकूट पर्वत भव्य असाच आहे. पर्वताच्या गर्भात शिरण्यासाठी भुयारी मार्ग आहे. गुहेत प्रवेश करताच कानावर "ओम गणपतये नम:'चा मंगल स्वर पडतो. गुहेच्या या पहिल्या दालनात सर्वप्रथम दर्शन घडते ते वैदर्भी अष्टविनायकांचे. नागपूरचा टेकडी गणेश, भंडाऱ्याचा भृशुंड, रामटेकचा अठराभुजा, कळंबचा चिंतामणी, आदासा अशा या वैदर्भी अष्टविनायकांचे मनोहारी दर्शन होते. "ओम'ची भव्य विश्वविक्रमी प्रतिकृती आहे. 350 फूट लांब, 14 फूट रुंद असलेल्या या ओमच्या प्रतिकृतीत प्रवेश करताच रामायणातील प्रसंग आपल्यासमोर मूर्तिरूपात साकारतात. सीतास्वयंवर, केवटप्रसंग, शबरीची बोरे, राम-भरत भेट, शूर्पणखा-लक्ष्मण प्रसंग, सुवर्णमृग, लक्ष्मणरेखा, सीताहरण, जटायू संवाद, राम-हनुमान भेट, वालीवध, हनुमान-सीता भेट, रावणवध व शेवटी राम राज्याभिषेक या सर्व प्रसंगांतून आपल्यासमोर "रामायण' उभे राहते.
परिसरातील "हिरवा गालिचा' डोळ्यांना सुखावणारा आहे. शालेय सहलीसाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे.
पोलिस
नागपूर-जबलपूर मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात होत असतात. या भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. अवैध धंदेसुद्धा मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. यात 22 गावांचा समावेश आहे. पण, या गावांची सुरक्षा केवळ चार पोलिस कर्मचारी करीत आहेत. यात एक पोलिस उपनिरीक्षक, एक वाहतूक पोलिस व दोन कॉन्स्टेबल आहेत. महामार्गावर जर मोठा अपघात झाला, तर पोलिस चौकी बंद करून पोलिसांना जाणे भाग पडते. तपासाकरिता कुठे गेल्यास पोलिस चौकी बंद असते. त्या वेळी जनतेला आपल्या तक्रारी घेऊन कुठे जायचे, हे माहिती नसते. या भागात 22 गावे समाविष्ट असल्यामुळे केवळ चार पोलिस पुरेसे नाहीत. या पोलिस चौकीत 20 पोलिस कर्मचारीसंख्या वाढवावी; जेणेकरून या चार पोलिसांवर ताण पडणार नाही.
आरोग्य केंद्र
मनसर परिसरालगतच्या गावांमध्ये आरोग्य सुविधांची वानवा आहे. जवळपासच्या 22 गावांतील नागरिक उपचारासाठी मनसर येथे येतात. परंतु, आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना नागपूरला जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो. शिवाय उपचाराअभावी रुग्ण दगाविण्याची भीती असते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील या गावात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे.
तलावाचे सुशोभीकरण
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व लाभलेल्या मनसरच्या सौंदर्यात पुरातन तलावाने भर घातली आहे. परंतु, अनेक वर्षांपासून उपसा न झाल्याने तलावाची पाणी साठवणक्षमता कमी झाली आहे. या तलावाचे खोलीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने येथे बोटिंगची सुविधा व्हावी. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.
उच्च शिक्षण
लगतच्या 20 ते 22 गावांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु, उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे गुणवत्ता असताना विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागते. गावात वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेचे पदवीपर्यंत शिक्षण मिळणे गरजेचे आहे.
बालोद्यान
वयोवृद्ध तसेच निवृत्त नागरिकांसाठी गावात हक्काचे ठिकाण नाही. गावातील मुख्य चौकात तरुणांचे जत्थे राहत असल्याने वृद्धांना सायंकाळच्या वेळी बसण्यासाठी जागा नाही. गावातील मोकळ्या जागेत एखादे उद्यान झाल्यास वृद्धांना वेळ घालविण्यासाठी ठिकाण मिळेल. तसेच मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळेल.
अतिक्रमण
राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे औद्योगिकदृष्ट्या मनसरला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महामार्गावर जड वाहतुकीची दिवसरात्र रेलचेल असल्यामुळे परराज्यातून आलेले ट्रकचालक, वाहक यांचा रस्त्यालगत ठिय्या असतो. रोजमजुरी करणारे नागरिकही या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत आहे. यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास होत आहे. वाढत्या अतिक्रमणावर कारवाई होणे गरजेचे आहे.
बसस्थानक
नागपूरपासून जवळ आणि राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बसथांब्यावर सतत प्रवाशांची गर्दी असते. परंतु, तेथे मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना जवळील पानटपरी, हॉटेलमध्ये थांबावे लागते. विद्यार्थ्यांना विशेषत: महिला आणि मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बसस्थानकाचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे.
स्मशानघाट
गावातील स्मशानघाटावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्मशानघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्काराला जाताना नागरिकांना कसरत करावी लागते. तसेच घाट परिसराची कधीच स्वच्छता होत नसल्याने येथे कचऱ्याचे साम्राज्य आहे. दुर्गंधीच्या वातावरणात नागरिकांना अंत्यविधी पार पाडावे लागतात. पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा आदींचा येथे अभाव आहे.
पत्रावळी-द्रोणाचा व्यवयाय
पूर्वीच्या काळी लग्नसमारंभ किंवा कोणत्याही कार्यात जेवणासाठी पत्रावळी आणि द्रोणांचा वापर होत असे. नागपूर जिल्ह्यात मनसर हे पत्रावळी आणि द्रोणांसाठी प्रसिद्ध होते. येथे घरोघरी हा व्यवसाय होता. परंतु, कालांतराने पत्रावळी आणि द्रोणांची मागणी कमी झाली. परंपरागत व्यवसायाला उतरती कळा आली. घरोघरी दिसणारा हा व्यवयाय आता गावात कुठेही दिसत नाही. हातचे काम गेल्याने गावात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राजकीय दुर्लक्षामुळे गावाचा विकास झालेला नाही. बेरोजगारांना काम मिळण्यासाठी गावात उद्योगधंदे निर्माण होणे गरजेचे आहे.
....
पहिले सरपंच नेरकर
मनसर ग्रामपंचायतीची स्थापना 18 सप्टेंबर 1948 रोजी झाली. पहिल्या सरपंचपदाचा मान दत्तात्रेय नेरकर यांना मिळाला. गावात दर गुरुवारी बाजार भरतो. परिसरातील लहान-मोठ्या गावांसाठी हीच बाजारपेठ आहे. बाजाराच्या दिवशी लगतच्या 22 गावांतील नागरिकांची येथे गर्दी होते. त्यामुळे बाजारात नागरिकांसाठी मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे.
...
...
वाचनालय
इंटरनेट आणि मोबाईलमध्ये रमणारी आजची तरुणपिढी वाचनापासून परावृत्त होत आहे. तरुणांनाच नव्हे, तर सर्वांना वाचनाचे महत्त्व कळावे, यासाठी गावात वाचनालय असणे गरजेचे आहे. गावात पदवीधरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, अभ्यासासाठी वेगळे ठिकाण तसेच अत्यावश्यक पुस्तके नसल्याने येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात. त्यामुळे वाचनालयात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके असावी. तसेच तज्ज्ञ व्यक्तींकडून तरुणांना मार्गदर्शन मिळण्याची सोय असावी.
...
क्रीडांगण
शैक्षणिक प्रगतीसोबत आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे. गावात क्रीडांगण नसल्याने बालकांच्या कलागुणांना वाव मिळत नाही. मैदान नसल्याने विद्यार्थ्यांना ओबडधोबड ठिकाणी सराव करावा लागतो. सोयीसुविधा नसल्यामुळे उत्तम क्रीडागुण असताना विद्यार्थ्यांचे खेळाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे गावात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज क्रीडांगण असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तरुणांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळेल; तर वृद्धांना वेळ घालविण्यासाठी जागा.
...
अवैध व्यवसाय
हाताला काम नसल्याने तरुणपिढी भरकटण्याच्या मार्गावर आहे. गावातील मुख्य चौकात तरुणांचे कट्टे दिवसभर बसलेले असतात. या ठिकाणी लहान-मोठे सारेच सट्टा लावताना दिसतात. पानठेला, चहाटपरी, लहान-मोठे हॉटेल्स या ठिकाणी दिवसभर खुलेआम सट्टा चालतो. याशिवाय अवैध दारूविक्री वाढत आहे. दारुड्यांच्या वाढत्या संख्येमुळे गावातील शांतता नाहीशी झाली आहे. दिवसरात्र दारुड्यांची मैफल रंगत असल्याने महिला तसेच मुलींचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
.....
प्रतिक्रिया
नागरिकांनी नियमितपणे कराचा भरणा केल्यास गावाचा विकास होण्यास मदत होईल. याशिवाय प्रत्येकाने आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यामुळे रोगराई पसरणार नाही. ज्या नागरिकांचे बीपीएल यादीत नाव आहे; परंतु घरकुलाच्या मास्टर प्लानमध्ये समावेश नाही, त्यांच्या नावांची नोंद होणे गरजेचे आहे.
- कैलास नरुले, सरपंच
येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. केवळ त्याच दिवशी साफसफाई होते. इतर दिवशी कर्मचाऱ्यांचा पत्ता नसतो. त्यामुळे घाण पसरलेली असते. मनसर येथील सट्टाव्यवसाय जोरात सुरू आहे. त्यामुळे गावात अशांतता पसरलेली असते.
- अन्नू काद्री, ग्रामपंचायत सदस्य
मनसर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना असभ्य वागणूक मिळते. गावात नियमित व स्वच्छ पाणी मिळावे. नवीन उद्योगधंदे सुरू व्हावे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे.
- जयदेव शेंडे, अध्यक्ष, भ्रष्टाचार निवारण समिती
मामा तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असताना गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तलावाचे पाणी फिल्टर केल्यास पाणीटंचाई भासणार नाही. गावात खेळाचे मैदान नाही. आमदार, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य यांनी पक्षपात न करता गावाचा विकास व्हावा, हाच उद्देश ठेवावा. अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण होऊन अतिक्रमण काढावे. बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी शौचालय असणे गरजेचे आहे.
- अरुण बन्सोड, पं. स. सदस्य, मनसर
नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तहसीलदारांनी महिन्यातून एकदा तरी ग्रामपंचायतीत यावे; जेणेकरून नागरिकांना आपल्या समस्या सांगता येतील. बीपीएल कार्डधारकांना त्वरित शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे.
- कलावती तिवारी, ग्रामपंचायत सदस्य
गावात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बसथांबा असणे गरजेचे आहे. याशिवाय प्रवाशांसाठी सुलभ शौचालय आणि पाण्याची सुविधा असावी. मोठ्या प्रमाणात मॅंगनीज खाणी असल्याने गावात मोठी कंपनी निर्माण झाल्यास हजारो बेरोजगार हातांना काम मिळेल.
- अभय रेड्डी
येथील आठवडी बाजारात जवळपास 25 हजार नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र, हा बाजार राष्ट्रीय महामार्गावर भरत असल्याने वाहतूक खोळंबते. अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
- नंदकिशोर चंदनखेडे
गावात मुस्लिमांसाठी कब्रस्तान नाही, ही शोकांतिका आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीला माहिती दिली; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पावले उचलावे.
- फिरोज शेख, उपाध्यक्ष, कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग
मनसर येथे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. प्रत्येक वॉर्डात नाली ही भूमिगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मामा तलावाचे सुशोभीकरण केले जाईल.
- आशाताई गायकवाड, सभापती, कृषी व पशुसंवर्धन
गावात एखादा औद्योगिक प्रकल्प होणे गरजेचे आहे. मनसर परिसरात विजेचा प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना नियमित वीजपुरवठा, गॅस सिलिंडरची घरपोच सुविधा मिळावी.
- किशोर जुनघरे
मनसर पर्यटनक्षेत्र असल्यामुळे येथे उद्योगधंदे नाहीत. परंतु, पर्यटनाच्या दृष्टीने गावाचा विकास होणे गरजेचे आहे. गावात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गावातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीचे कशावरही नियंत्रण नाही.
- पंकज सोमकुंवर, सामाजिक कार्यकर्ते
--------------------------------------
समस्या यांना सांगा

- दृष्टिक्षेपात
- लोकसंख्या : 7139
- भौगोलिक क्षेत्र : 638.93 हेक्टर
- वॉर्ड : 5
- प्राथमिक शाळा : 1
- माध्यमिक शाळा : 3
- खासगी कॉन्व्हेंट : 4
- अंगणवाडी : 8
- हातपंप : 36
- शासकीय विहीर : 22
- राष्ट्रीयीकृत बॅंक : 2
- सहकारी पतसंस्था : 1
- टपाल कार्यालय : 1
- प्राथमिक आरोग्य केंद्र : 1
- महिला मंडळ बचतगट : 28

- खासदार कृपाल तुमाने : 9823288322
- आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी : 9422145922
- तहसीलदार प्रसाद मते : 9923013456
- सरपंच : 9096167094
- ठाणेदार : 9820093999
- कनिष्ठ अभियंता पवन जाधव : 7875027295
- खंडविकास अधिकारी : 9422124779
- ग्रामविकास अधिकारी : 7875610998