गावयात्रा जोड
वनकायद्याची अडचण
देवलापारपासून एक किलोमीटर अंतरावरील ऐतिहासिक वास्तू आणि राणी दुर्गावतीचा किल्ला सहाशे ते सातशे वर्षे पुरातन आहे. किल्ल्याचे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. किल्ल्यालगत दिवाणशाहांचा दर्गा आहे. हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. परंतु वनविभागाचे कठोर कायदे आणि वनकायद्याच्या अडचणींमुळे हा भाग विकासापासून वंचित आहे. तरीसुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात.
...
आरोग्यसेवेचा अभाव
देवलापारमध्ये परिसरातील साठ ते सत्तर गावांतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे. परंतु येथे पाहिजे तशी सुविधा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे रुग्णालयात एकही स्त्री तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नाही. राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना सोयीसुविधांअभावी नागपूरला हलवावे लागते. उपचारास विलंब झाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याची चांगली सुविधा असावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
...
उच्च शिक्षणाची सोय व्हावी
शैक्षणिक क्षेत्रातही देवलापारची फारशी प्रगती झालेली नाही. गावात दोन उच्च माध्यमिक, दोन प्राथमिक शाळा व एक महाविद्यालय आहे. याशिवाय एक आश्रमशाळा व दोन अनुदानित आश्रमशाळा आहेत. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रामटेकव नागपूरला जावे लागते. बारावीनंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अप-डाऊनशिवाय पर्याय नाही. शिक्षणातील वाढत्या स्पर्धेमुळे गावात पदवीपर्यंत शिक्षणाची सोय होणे गरजेचे आहे.
....
वाढत्या गुन्हेगारीची समस्या
गुन्हेगारी व अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी देवलापार येथे पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे व पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नसल्यामुळे गावात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गावातील मुख्य चौकात बेरोजगार तरुणांचे टोळके दिवसभर बसले असते. तरुणांच्या हाताला काम मिळाल्यास गुन्हेगारी कमी होऊ शकते.
...
अवैध शिकारीचे वाढते प्रमाण
देवलापार क्षेत्र वनविभागातील वनसंपदा, मुरुम, वाळू, लाकूड, वनौषधी, सागवान, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. परंतु अधिकाऱ्यांचा कुणावरही जरब नसल्याने अवैध शिकारीचे प्रमाण वाढत आहे. यासोबत अवैध उत्खननाची समस्याची आहे. या साऱ्या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे.
...
बिनकामाचे तहसील कार्यालय
पाच ते सहा महिन्यांपूर्वी गावात राजस्व विभागाचे तहसील कार्यालय सुरू झाले. एक नायब तहसीलदार व दोन कर्मचाऱ्यांनी नेमणूक करून कारभार सुरू झाला. सदर कार्यालय शोभेचे असून, अनेक वेळा चकरा मारूनही काम होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. 40 किलोमीटरवरील रामटेक येथील तहसील कार्यालयात त्वरित काम होते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
...
बेरोजगारीची समस्या
गावात रोजगारांची कमतरता असल्याने तरुणांना नागपूर गाठून मिळेल ते काम करावे लागते. तेथे राहण्याची, खाण्याची सोय नसल्याने बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय नागपूर शहराच्या लोकसंख्येत भर पडते. गावातील अनेक तरुण नागपूरला स्थायिक झाल्याने गाव ओसाड पडले आहे. त्यामुळे येथेच एखाद्या रोजगाराची निर्मिती व्हावी, अशी तरुणांची मागणी आहे.