चार वाजंत्री ठार
ट्रकने टाटा सुमोला चिरडले
28/5/2015
कन्हान (जि. नागपूर) : मौदा तालुक्यातील रेवराल येथून नागपूर येथे विवाहासाठी जाणाऱ्या बॅंण्ड पार्टीच्या टाटासुमोला ट्रकने चिरडले. यात चार जणांचा मृत्यू झाला. सहा जण गंभीर आहेत. ही घटना कन्हान परिसरातील नीलज (खंडाळा) गावाजवळ बुधवारी (ता. 27) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मृतात गणपत रामाजी हरकंडे (वय 28, रा. रेवराल), राष्ट्रपाल सुखराम बावणे (वय 27) मु. पो. टावेपार (भंडारा), राजू सोनवाने, कपूरचंद लाडेकर यांचा समावेश आहे.
रेवलराल येथील बेबीताई ठाकरे यांच्या मुलाचा विवाह नागपूर येथे होता. वरपक्षाची मंडळी सकाळीच निघाली. टाटो सुमो (क्र. एम.एच. 31 झेड-06335) मध्ये सर्व बॉण्ड पार्टीचे वाजंत्री बसले होते. हे वाहन तारसा-कन्हानमार्गे जात असताना नीलज (खंडाळा)जवळ समोरून आलेल्या दहाचाकी ट्रक (क्र. एम.एच. 49-0508)ने जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने भरधाव होती. त्यामुळे ट्रकने सुमोला रस्त्याच्या खाली फरफटत नेत चिरडले. यात सुमोचा चेंदामेंदा झाला. यात गणपत रामाजी हरकंडे (वय 28, रा. रेवराल) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यात बसलेले सर्वजण गंभीर जखमी झाले. वाहनात फसलेल्या सर्वांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपाल सुखराम बावणे (वय 27) मु. पो. टावेपार (भंडारा) याचा मेयो रुग्णालय नागपूर येथे हलविल्यानंतर मृत्यू झाला. अतिगंभीर जखमीत राजू सोनवाने, कपूरचंद लाडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक अनोळखी व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मेयोतील वॉर्ड क्रमांक 21मध्ये जितेंद्र ताराचंद वाढवे (वय 24, पुजारी टोला गोंदिया), रामा जगन हरकंडे (वय 50), बबन केशवराव लेंढे (वय 42, रा. रेवराल), गणेश मारोतराव शेंडे (वय 30, रा. कोदामेंढी), पंकज सुखराम बावणे (वय 26, टावेपार, जि. भंडारा) यांना भरती करण्यात आले.
वाहनाचे पार्ट तोडून काढले बाहेर
दहाचाकी ट्रकच्या चाकाखाली चिरडलेल्या सुमोत आत फसलेल्या मृतासह जखमींना बाहेर काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. सुमोचे पार्ट तोडून गणपतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
------------------------
नीलजजवळील दुसरी घटना
नीलज (खंडाळा) शिवारातील ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. कन्हान-तारसा मार्गावरील या गावाजवळ कालव्याचा पूल उंचावर असून, वाहने एकमेकांना दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताच्या घटना होत आहेत.
-----------------
नागरिकांचा पोलिसांवर रोष
घटनेची माहिती देऊनही पोलिस उशिरा आल्याने स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश कंतेवार, कन्हानचे ठाणेदार मौला सय्यद यांनी संतप्त जमावास शांत केले. पोलिसांच्या नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रवाना केले.