विजेअभावी सिंचन व्यवस्था कोलमडली
वेलतूर, 17 /6/2015: पावसासह वीजवितरण कंपनी परिसरातील शेतकऱ्यांच्या जिवावर उटली आहे. योग्य वीजपुरवठ्याअभावी सिंचन व्यवस्था कोलमडली आहे.
पीक जगविण्यासाठी विहीर, कूपनलिका व नहराच्या पाण्याचा उपयोग शेतकरी करतात. परंतु, परिसरातील वीज वितरण व्यवस्था कर्मचारी व ठेकेदाराच्या निष्काळजीने मोठ्याप्रमाणात नादुरुस्त असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ठेकेदारांनी पावसापूर्वी करावयाची अनेक कामे पार पाडली नसल्याने या समस्या उद्भवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. परिसरातील अनेक वीज रोहित्र (ट्रान्सफार्मर) जळालेले आहेत. त्यासाठी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह ठेकेदार ग्राहकांकडून अवैध वसुली करून दुरुस्तीची थातूरमातूर कामे करत आहे. ग्राहकांकडून वीजबिलासह जळालेल्या रोहित्राच्या फिटिंगचाही खर्च आकारण्यात येत आहे.
वेलतूर, सिर्सी, खैरलांजी, गोन्हा, तुडका, चिखली, धानला, खोकरला, रत्नापूर, मालोदा शिवारातील रोहित्र नादुरुस्त असून, वीज मंडळाची बघ्याची भूमिका साऱ्यांचीच अस्वस्थता वाढविणारी ठरत आहे. पावसाअभावी शेतात पेरलेल्या सोयाबीन, धान, कापूस, मिरची पिकाला धोका निर्माण झाला आहे. वीज कंपनीने रोहित्र वेळीच दुरुस्त करून किंवा नवीन लावल्यास त्या पिकांना जीवनदान मिळेल. वेलतूर येथील शेतकरी सुरेश अतकरी, धनराज पडोळे, भाऊराव खोब्रागडे, रामकृष्ण खोब्रागडे, लहू बारई, बळीराम कुलरकर, बंडू चापले, विलास वैरागडे, रामसागर चाकूलकर, मिलिंद तिजारे यांनी दुरुस्तीची मागणी केली. त्यांच्या शिवारातील राहित्र 15 दिवसांपूर्वी बंद पडले. त्याची दुरुस्ती झाली. मात्र, ते तिसऱ्याच दिवशी बंद पडले.
जबरानज्योत शेतकऱ्यांनी दिले मागण्यांचे निवेदन
मांढळ, 19/6/2015
मंगळवारी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गावातील सुमारे दोनशे शेतकरी, शेतमजूर, झोपडपट्टीधारकांनी भाकपचे वसंता मुंडले व माजी जि. प. सदस्य देवराव भुरे यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
वनअधिनियम 2006 व 2008 अन्वये मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याची व्यवस्था करावी, घरकुल मिळावे, गॅस जोडण्या मोफत मिळाव्या, जंगलालगत राहणाऱ्यांना तेंदूपत्ता, सरपण-लागडे, चारं, मोहफुल, फळे, डिंक आदींसाठी मुभा देण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी लक्ष्मण आवारे यांनी 120 तरुणांना प्रशिक्षणाला पाठविले, दहावी पास विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा अभियांत्रिकी पदविका कमवा व शिका या योजना असल्याचे निवेदन देणाऱ्यांना सांगितले. 2000 पूर्वीचे सुमारे 540 प्रकरणे उपविभागीय कार्यालयाला पाठविल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी सोलर कुंपणाचे प्रावधान केले असून त्यात देणी, वाठोडा, तारणा, वीरखंडी, हरदोली, चिकना, धामना, टोला, डोंगरमौदा, ठाणा, वेळगाव, रेंगातूर, गोठणगाव अशा 13 गावांचा समावेश असल्याचे चर्चेदरम्यान सांगितले. ब-याचशा समस्यांचे समाधानकारक निरसन झाल्याचे भाव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी कुहीचचे सहायक पोलिस निरीक्षक गंधेवार त्यांच्या पोलिस ताफ्यासह उपस्थित होते. मांढळच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास छावणी स्वरूप आल्याचे दिसत होते. यावेळी मधुकर मानकर, वसंत मुंडले, मारोतराव धुर्वे, बारसू शिवूरकर, नीलकंठ डहारे, शांताबाई कुंभले यांच्यासह दोनशे शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.