ट्रक-ट्रेलर अपघातात दोन ठार
टाकळघाट फाट्याजवळील घटना, टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित
बुटिबोरी/टाकळघाट, ता. 19 : नागपूर-वर्धा मार्गावरील बुटीबोरीवरून 5-6 किमी अंतरावर टाकळघाट फाट्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास ट्रक व ट्रेलरच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले.
साखर घेऊन जाणारा ट्रक (क्र. सीजी 04 डीजी 8112) वर्ध्याकडे जात होता. या ट्रकचा टाकळघाट फाट्याजवळ टायर फुटल्याने समोरून भरधाव येणाऱ्या ट्रेलर (क्र सीजी 07 सीए 4151)ला जोरदार धडक बसली. ट्रेलरमध्ये 16 लोखंडी खांब बुटीबोरीकडून जबलपूरला नेण्यात येत होते. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा दर्शनी भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. घटनेत दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. मृताची नावे कळू शकली नाहीत. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दोन्ही चालकांचे मृतदेह ट्रक व ट्रेलरच्या समोरील भागात दबले होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून दबलेले मृतदेह बाहेर काढले. मृतदेह नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार भारत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती ढगे करीत आहेत.
ऊर्जा बचतीला बुटीबोरीत ठेंगा
बुटीबोरी : महावितरणला वीज बचतीची सूचना दिल्यानंतरही सध्या बुटीबोरी परिसरातील पथदिवे दिवस-रात्र सुरू असल्याचे चित्र आहे. एकीकडे भारनियमनात वाढ तर दुसरीकडे दिवस-रात्र सुरू असलेले पथदिवे अशी विरोधाभासी स्थिती बुटीबोरीत आहे. बुटीबोरी मुख्य चौकातील पथदिवे तसेच वॉर्ड क्रमांक 3 मध्ये पथदिव्यांवरील लाईट कित्तेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. एकीकडे वाढते भारनियमन तर दुसरीकडे दिवस-रात्र सुरू असलेले पथदिवे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. वाढत्या उकाड्यात होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त आहेत. विजेच्या दुरुपयोगास जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.