देयके येतात उशिरा, तरीही पैसे वेळेत भरा
एकच वीजबिल केंद्रामुळे ग्राहकांची गैरसोय
वानाडोंगरी, ता. 19 ः मासिक वीज देयके उशिरा मिळत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. जर उशिरा बिल भरले तर दंडाची रक्कम आकारण्यात येते. त्यामुळे वेळेत वीजबिल पाठविण्याची मागणी होत आहे.
अनेकांना वाजवीपेक्षा जास्त रकमेची वीज देयके आल्याने दुरुस्तीसाठी चकरा माराव्या लागत आहेत. जून 2015चे बिल ग्राहकांना 8 जुलैपर्यंत भरायचे होते. 8 जुलैनंतर दहा रुपये दंड होता. बिलावर तारीख 29 जून आहे. परंतु ग्राहकांना वीजबिल उशिरा मिळत आहे. ज्या तारखेपर्यंत बिल भरायचे असेल त्याच तारखेला बिल मिळाले तर भरायचे केव्हा, असा प्रश्न ग्राहकांपुढे आहे.
गोरगरीब ग्राहकांना बिलासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागते. ऐन वेळेवर देयक मिळत असल्याने ग्राहकांना दहा रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अंतिम तारखेनंतर देयकाची रक्कम भरल्यास तीस रुपये जास्तीचे भरावे लागतात. हिंगणा तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अभियंत्यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही उपाययोजना करण्यात आली नाही.
हिंगणा परिसरात एकच वीज देयक भरणा केंद्र आहे. बिल भरण्यासाठी लांबच लांब रांग असते. त्यामुळे ग्राहकांना रोजमजुरी बुडवून थांबावे लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्राहकांना उन्हात रांगेत उभे राहावे लागते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा केली जात नाही.
विजेची समस्या
हिंगणा परिसरातील वीज कर्मचारी उन्हाळा असो की पावसाळा मुख्यालयी राहात नाहीत. पावसाळ्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. एकदा वीज गेली तर रात्र विजेशिवाय काढावी लागते. देवळी पेंढरी परिसरात दोन- दोन दिवस वीजपुरवठा बंद राहतो. याचा विपरीत परिणाम पाणीपुरवठ्यासह लघुउद्योगांवर होत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात तारांवर तार टाकून वीजचोरी केली जात आहे. गावात मोजक्याच घरी वीजजोडणी आहे. परंतु प्रत्येक घरी विजेचा प्रकाश असतो. यावरून फुकटची वीज वापरणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते.