23 Jun 2015

पारशिवनी

पारशिवनीच्या तनिष्का घेणार टेकाडी दत्तक
गाव विकासासाठी घेणार आमदार, तहसीलदारांची भेट


पारशिवनी, ता. 19 : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तनिष्कांची नुकतीच बैठक नीलूताई भुजाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तालुक्‍यातील आदिवासीबहुल टेकाडी (कान्हादेवी) हे गाव दत्तक घेण्याचे ठरविण्यात आले.
त्याकरिता पारशिवनीचे तहसीलदार बाळासाहेब टेळे व खंडविकास अधिकारी बी. बी. जाधव यांच्याशी चर्चा करून गावाचा आराखडा कसा तयार करता येईल, याकरिता लवकरच भेट घेणार आहे. आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांची भेट घेऊन विकासकामांवर चर्चा करण्यात येईल.
यावेळी तनिष्का सदस्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तनिष्काच्या गटनेतेपदी अर्चना तरार यांची, तर उपगटनेतेपदी मनीषा खंडाते यांची निवड करण्यात आली. "पारशिवनी तालुक्‍याचा विकास, हाच तनिष्कांचा ध्यास' या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या वर्षात नव्याने तनिष्कांनी कोणती कामे हाती घ्यायची, याबाबत विचारविनिमर्श करण्यात आला. यावेळी तालुका समन्वयक नीलूताई भुजाडे, प्रभाताई कडू, संगीता कापसे, डॉ. माधुरी बावनकुळे, गटनेत्या अर्चना तरार, उपगटनेत्या मनीषा खंडाटे, राखी बेले, अर्चना भोयर, माया कुंभलकर, सविता ठाकरे, प्रतिभा दुपारे, श्रीमती भक्ते, मोटघरे, सविता डोमकी, बेबीबाई भागवत, प्रेमलता बागडे, माधुरी सुरकार, फरहाना शेख, गीता कुरळकर, तालुका बातमीदार देवानंद शेंडे उपस्थित होते. 
 
Blogger Templates