आहे स्मार्ट तरीही
आउट ऑफ कव्हरेज
मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे... थ्री-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे टू-जीची सेवा मिळणे... वापर कमी असतानादेखील बिलच जास्त येणे... शेजारी-शेजारी फोन असतानादेखील फोन न लागणे... अशा विविध कारणांमुळे सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाकडे करायची, याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये आयडिया, एअरटेल, रिलायन्स, व्होडाफोन, डोकोमो, युनिनॉर, एअरसेल यांच्यासह सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचासुद्धा सहभाग आहे.
सध्याच्या काळात मोबाईलशिवाय जगणे कठीण झाले आहे, त्यामुळे नाममात्र अपवादवगळता सर्वांकडे मोबाईल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाईल कंपन्यांचे सिमकार्ड वापरतात. मात्र, अलीकडे मोबाईल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत. प्रत्येक मोबाईल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहीना काही तक्रार असल्याचे आढळून आले आहे. शहरातील अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाईल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाढाच वाचून दाखविला. बीएसएनएल ही कंपनी शासनाची आहे. मात्र, या कंपनीचे सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे आढळून आले.
एरर कनेक्शन
बीएसएनएल मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, आधी तो मोबाईल क्रमांक "कव्हरेज एरिया'च्या बाहेर गेल्याचे उत्तर मिळते. पण, लगेच दुसऱ्यांदा फोन लावल्यास त्वरित संपर्क होतो. तसेच फोन सुरू असतानाच कट होऊन "नो नेटवर्क कव्हरेज' किंवा "एरर कनेक्शन' मेसेजेस मोबाईलच्या डिस्प्लेवर पाहावयास मिळतात. अवघ्या एका फुटाच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवरही संपर्क होत नसल्याचा चमत्कार केवळ बीएसएनएलच करू शकते. कॉल सुरू असताना पलीकडच्या व्यक्तीचा आवाज ऐकू न येणे किंवा स्वत:चाच आवाज स्वत:लाच ऐकू येणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
आपण डायल केलेला क्रमांक व्यस्त...
बीएसएनएलच्या काही किमया तर गमतीशीर आहेत. काही वेळा बीएसएनलच्या मोबाईलवरून इतर कंपन्यांच्या मोबाईलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास "आपण डायल केलेला बीएसएनएल क्रमांक व्यस्त आहे किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे' असे उत्तर मिळते. बीएसएनएल मोबाईलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास "आपण डायल केलेला आयडिया किंवा एअरटेल क्रमांक बंद आहे' असेही उत्तर मिळते. एखादा कॉल सुरू असताना मधेच दुसऱ्या कॉलची रिंग ऐकू येणे, संभाषण सुरू असताना मधेच अन्य मोबाईलवर सुरू असलेले संभाषण ऐकायला मिळणे, हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यात आता "मोबाईल पोर्टेबिलिटी'मुळे तर बीएसएनएलचे तंत्रज्ञच संभ्रमावस्थेत आहेत. बीएसएनएलवरून कोणता क्रमांक लावला आहे, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. त्यामुळे चित्रविचित्र "रेकॉर्डेड मेसेज' लोकांना ऐकावे लागत आहेत.
हॅण्डसेट झाले निकामी
धानला येथे आयडिया, एअरटेल, टाटा डोकोमो, रिलायन्स, बीएसएनएल, व्होडाफोन कंपनीचे मोबाईल टॉवर आहेत. परंतु, बीएसएनएल व रिलायन्स कंपनीची सेवा नेहमी बंद असते. धानला हे गाव परिसरातील लोकवस्तीने मोठे आहे. जवळपास सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपले मोबाईल टॉवर येथे उपजाऊ जमिनीत अनधिकृत उभे केले. अनेक टॉवर वस्तीतच असल्यामुळे नारिकांच्या आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होतो.
सुरवातीला सर्वच मोबाईल कंपन्यांनी टॉवरजवळ बॅटरी आणि जनरेटरची व्यवस्था केली. देखरेख करण्याकरिता ऑपरेटरचीही नियुक्ती केली नाही. काही महिनेच सेवा ग्राहकांना सुरळीत मिळाली. नंतर यातील काही कंपन्यांनी ऑपरेटरला काढले. रिलायन्स, बीएसएनएलने ग्राहकांना वाऱ्यावर सोडले. वारंवार तक्रारी करूनही काही समाधान होत नसल्यामुळे नागरिकांनी तक्रारी करणेही बंद केले आहे. रिलायन्स कंपन्यांनी प्रारंभी सिम नसलेला मोबाईल बाजारात आणला. आता कव्हरेज राहत नसल्याने हे हॅण्डसेट निकामी झाले आहे. त्यामुळे या हॅण्डसेटमध्ये दुसऱ्या कंपनीची सिम टाकता येत नाही. या मोबाईलचे आता करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोमिंग चार्जचा फटका
पारशिवनी तालुक्यातील कोलीतमारा परिसरातील सुरेरा, महकेपार, नरहर, बनेरा, घाटपेंढरी, घाटकुकडा, ढवळापूर, अंबाझरी, सालेघाट, शिलादेवी, कुवारा भिवसेन, पेंचकुकडा आदी आदिवासी गावे आहेत. जवळपास 10 हजार लोकसंख्या आहे. येथे घनदाट जंगल असल्यामुळे मोबाईल कव्हरेजचा प्रश्न निर्माण होतो. येथील काही उंचावरील भागात रामटेक तालुक्यातील टुय्यापार येथील टाटा इंडिकॉमचे कव्हरेज कधी येते, तर कधी जाते. घाटपेंढरी हे गाव महाराष्ट्रात असल्यानंतर येथे थोड्याफार प्रमाणात मध्य प्रदेशातील खमारपाणी येथील कव्हरेज पकडते. त्यामुळे येथे रोमिंग चार्ज लागते. हीच स्थिती घाटकुकडा येथील आहे. या परिसरात टुय्यापार येथील टाटा इंडिकॉमच्या टॉवरची रेंज वाढवून, ढवळापूर, नरहर येथे टॉवर उभारण्याची गरज आहे. नवेगाव खैरी येथे रिलायन्स टॉवर आहे. मात्र, त्याला रेंज राहात नसल्याने ग्राहकांची गैरसोय होते. आवळेघाटला टाटा इंडिकॉमचे टॉवर आहे. त्यामुळे त्या परिसरात दुसऱ्या कोणत्याच मोबाईलचे कव्हरेज राहात नाही.
रिचार्जही मिळेना
बुटीबोरी औद्योगिक परिसर असल्याने कामगारांची संख्या मोठी आहे. परप्रांतातून आलेल्या या कामगारांना आपल्या स्वगावी संपर्क साधण्यासाठी मोबाईल एकमेव आधार असतो. येथे मोबाईल टॉवर आहे. मात्र, नियमित नेटवर्क राहत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. टाकळघाट येथे नेटवर्क मिळण्याकरिता आईडिया, वोडाफोन, एयरटेल अशा तीन कंपन्यांचे टॉवर आहेत. पण, तीन कंपन्यांकडून सेवा सुरळीत पुरविली जात नाही. ग्राहकांची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकेतनुसार टॉवर नाहीत. बीएसएनएलचे रिचार्जही मिळत नाहीत. सरकारी कामात बीएसएनएलची सेवा असल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होते.
इंटरनेटची गती संथ
अरोली परिसरात बीएसएनएल व एअरटेल कंपनीची इंटरनेट मोबाईल सेवा कोलमडली आहे. गत आठवड्यापासून इंटरनेटची गती संथ आहे. याचा फटका लाखो ग्राहकांना बसत आहे. हजार लोकसंख्या असलेल्या गावांत बीएसएनल आणि एअरटेल कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. परंतु, सेवा सुरळीत नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. स्मार्टफोनमुळे आज प्रत्येकाला इंटरनेट सेवा गरजेची झाली आहे. परंतु, मोबाईल कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लाखोंचे टॉवर धूळखात
खापा येथील बीएसएनएल, रिलायन्स, एअरटेल या मोबाईल कंपनीची सेवा वारंवार खंडित होत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. खाप्यात रिलायन्स, बीएसएनएलच्या मोबाईल कंपनीचे नेटवर्क टॉवर आहे. कंपनीने नागरिकांच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्चून मोबाईल टॉवर उभारले. परंतु, योग्य सर्व्हिस मिळत नसल्यामुळे मोबाईल सेवा सतत बंद असते. खापा परिसरात दूरसंचार विभागाची सेवा नेहमी बंद असते. त्यामुळे कंपनीचे ग्राहक खासगी सेवेकडे वळले आहेत. काहींनी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दूरसंचार विभागाची ऑनलाइन नेटसेवा घेतली. परंतु, या सेवेत नेहमीच काही ना काही अडचण येत असल्याने याचा फटका व्यावसायिकांना बसतो. एअरटेल कंपनीची मोबाईलसेवा वारंवार खंडित असते. दिवसेंदिवस मोबाईलचे महत्त्व वाढत असताना खापा परिसरातील कुचकामी सेवेमुळे नागरिक त्रस्त आहेत.
जलालखेडा, भारसिंगीतील टॉवर बंदच
जलालखेडा येथे दूरसंचार विभागाने दहा वर्षांपूर्वी टॉवर लावले. मात्र, ते अद्याप सुरू झाले नाही. भारसिंगी येथील टॉवरदेखील बंद आहे. टॉवरच्या मोबदल्यात जमीन मालकास भाडे नियमित मिळत असलेतरी ग्राहकांना सेवा मिळालेली नाही. नरखेड आणि मोवाड येथील टॉवरवरून रेंज सुरळीत सुरू आहे. जलालखेडा येथे टॉवर आणि मशीन बसविण्यात आली. मात्र, त्या कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे येथे कव्हरेजची समस्या आहे.
थ्रीजी झाली निकामी
बोकारा, कोराडी परिसरात बीएसएनएल, आयडिया, व्होडाफोन आणि टाटा डोकोमो असे चार मोबाईल टॉवर आहेत. तरीही नेटवर्कअभावी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या तरुणांसह अनेकांकडे स्मार्ट फोन आहेत. इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु, टूजी तसेच थ्रीजीची सेवा अतिशय संथ असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मौदा तालुक्यात अनेक कंपनींचे टॉवर नाहीत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जवळपास सर्वच मोबाईलला कव्हरेज मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
----------------
प्रतिक्रिया
कोलीतमारा परिसरात असणाऱ्या ढवळापूर, कोलीतमारा, सुवरधरा या ग्रामपंचायतचे ऑनलाइन कामे होत नाही, ती कामे ऑफलाइनमध्ये करावी लागते. टुय्यापार येथे टाटा इंडिकॉमचे टॉवर आहे त्याची रेंज वाढविण्याकरिता व त्या परिसरात पुन्हा काही कंपन्यांचे टॉवर उभारावे, याकरिता पत्रव्यवहार केलेला आहे.
- डी. मल्लिकार्जुन रेड्डी
आमदार, रामटेक विधानसभा
सिग्नल वीक असलेल्या ठिकाणावरून फोन केला असता, आवाज फाटणे किंवा अस्पष्ट ऐकू येणे असे प्रकारही वारंवार घडतात. बीएसएनएलच्या सेवेचे तीनतेरा वाजल्याने बीएसएनएल मोबाईलधारक वैतागले आहेत. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी या सेवेत तातडीने सुधारणा करावी.
- सतीश कोल्हे, हिंगणा
कोलीतमारा परिसरात मोबाईल कव्हरेज नसल्यामुळे येथील लोकांना "मरणाचा निरोप, तेरवीलाच मिळतो' अशी दयनीय स्थिती येथील आदिवासी बांधवांची आहे.
- नरेंद्र सोमकुवर, कोलीतमारा
मोबाईल कव्हरेज मिळत नसल्याने अनेकदा आदिवासी भागातील लोकांना शासकीय योजनापासून वंचित राहावे लागते.
-पूर्णपाल पाटील, पारशिवनी
या परिसरात एक किंवा दोन टॉवर उभारल्याने होणारा मोबाईल कव्हरेजचा त्रास कमी होईल.
-रमेश तांदूळकर, नवेगाव खैरी
बीएसएनएलच्या सेवेमुळे ग्राहक खूप त्रस्त असल्याने त्यांच्यात या कंपनीबद्दल तीव्र नाराजीचा सूर आहे. विद्यार्थ्याना बीएसएनएलचे होमपॅक स्वस्त दरात मिळाल्याने ते स्वस्त पडते. परंतु, ही सरकारी सुविधा असूनसुद्धा या गावात नेटवर्क मिळत नाही, हे दुर्भाग्यच.
- आशीष लाजूरकर
बीएसएनएल तसेच खासगी इंटरनेटची सेवा अधूनमधनू खंडित होत असल्याने व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांना फटका बसतो. वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे खंडित सेवेमुळे कामे प्रभावित होऊन आर्थिक नुकसान होते.
-आशीष कुंभारे
मोबाईलसेवा खंडित होत असल्याने अनेकदा महत्त्वाची कामे रखडतात. सर्वजण ऑनलाइन झाल्यामुळे खंडित सेवा सुरळीत व्हावी.
- प्रशांत पराते
पावसाळ्याच्या दिवसांत इंटरनेट सेवा बंद होण्याचा सर्वाधिक त्रास होतो. आगामी काळात सुरळीत सेवा देण्यासाठी आतापासून तजविज करणे गरजेचे आहे.
- शशिकला जागेश्वर
बोखारा परिसरात अलीकडेच बीएसएनएलचे टॉवर लावण्यात आले. कोणत्या परिसरात कव्हरेज राहत नाही. याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. समस्यांची वेळीच दखल घेऊन निराकरण करण्यात येईल.
- श्री. सहारे, कोराडी, दूरसंचार उपकेंद्रप्रमुख