28 Apr 2015

गौणखनिज चोरी

कामठी : नागपूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातील महत्वाच्या असलेल्या कामठी तालुक्‍याअंतर्गत येणा47 ग्रामपंचायतीच्या 24 तलाठयांपैकी अनेक जण मुख्यालयी राहत नसल्यामुळे गौणखनिजांची चोरी करणांचे चांगलेच फावले आहे. दररोज लाखो रूपयाची चोरी होत असून त्यामुळे शासनाच्या तिजोरीला चुना लागत आहे.
अशीच एक घटना कामठी कळमना मार्गावर 7 एप्रिलला घडली. रनाळा ग्रामपंचायती अंतर्गत येणाकळमना रोडवर नहराला लागून असलेल्या जमीनीच्या मालकाने जवळपास शंभराच्यावर टकाने लाल माती घालण्यात आली आहे. व मोठया प्रमाणात अवैधरीत्या उत्खनन कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता हे उत्खनन सुरू आहे. याबाबत कामठीच्या तहसीलदारांच्या ही बाब सात एप्रिलला एका गृहस्थाने लक्षात आणून दिली की तालूक्‍यातील बिना भागात मोठया प्रमाणात उत्खनन सुरू असल्याची माहिती लक्षात आणून दिली असता मंडळ अधिकारी हिवरकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. रॉयल्टी न भरता हे उत्खनन सुरू असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रनाळयाच्या महिला तलाठी माधुरी वकील यांना पंचनामा करण्यास सांगितले यावेळी त्यांनी फक्त 60 ते 65 टकद्धारे 120 ब्रास माती असल्याची नोंद केली, पण वस्तुस्थिती काहीच वेगळीच आहे. यासंदर्भात तहसीलदार भोयर यांनी दोषींवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई न करता अब्दुल वाहाब वल्द अब्दुल उस्मान गणी नागाणी यांना 17 एप्रिलला तहसिल कार्यालयात बोलाविले पण ते अनुपस्थित राहिल्याची नोंद आहे. वास्तविकता परिसरात होणाप्रत्येक गौणखनिजांच्या चोरीची माहिती तहसीलदारांना देण्याची जबाबदारी तलाठयांची आहे, पण तलाठीच कार्यालयात राहत नसल्याने गौणखनिज चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच कामठी तालुक्‍यातील गुमथळा, उनगाव, सोनेगाव राजा, बिना, वारेगाव, भामेवाडा, चिकना, ग्रामपंचायतच्या हद्यीत येणारेतीघाटांपैकी फक्त वारेगाव व बिना या रेतीघाटांचाच लिलाव झाला आहे. मात्र उर्वरीत घाटांवर जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्याचा लिलाव झालेला नाही, परंतु या रेती घाटावरून रेती माफीयांनी एक टोळी तयार करून या घाटाचा लिलाव होवू देत नाही व अवैध रेतीचोर या ठिकाणाहून मोठया प्रमाणात रेती उत्खनन करून शासनाच्या तिजोरीला लाखो रूपयांचा चुना लावत असून असाच एक प्रकार मागील महिन्यात नेरी रेती घाटजवळच्या फोरलाईन रोडवर घडला होता. तहसिलदार भोयर यांनी रात्रीच्या वेळेला एका तलाठयाला सोबत घेवून दुचाकीने जावून नेरी व चिकना घाटावरून अवैधरित्या उत्खनन होत असलल्या रेतीच्या गाडया पकडल्या होत्या मात्र यासंदर्भात तहसीलदार भोयर यांनी दोषींवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई न करता त्या राजनितिक दबावाखाली त्यात आर्थिक व्यवहार करून परस्पर सोडून दिल्या या प्रकरणाची तक्रार वरीष्ठांकडे झाल्यावर या प्रकरणासंदर्भात तत्कालीन उपजिल्हाधिकारी शिंगणापूरकर यांनी तहसिलदारांना नोटीसही बजावली होती. मात्र या प्रकरणानंतर उपजिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने हे प्रकरण थांडबस्त्यात आहे. तालुक्‍यात होत असलेल्या या अवैध उत्खननाकडे महसूल विभागाबरोबर पोलीस प्रशासनाचे "अर्थपूर्ण" दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. 
 
Blogger Templates