उमरेड - तालुक्यात गाजत असलेल्या बिबट कातडी तस्करी प्रकरणात आणखी दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले. गोपालसिंग मोतीसिंग दुधाने (वय 45, रा. चिकमारा, जि. चंद्रपूर), ईश्वरसिंग मोतीसिंग दुधाने (वय 50, रा. भिवापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
भिवापूर येथील आयटीआय परिसरात वनविभागाने सापळा रचून बिबट्याच्या कातडीची तस्करी करताना रणजितसिंह जुनी याला 12 सप्टेंबर 2014 ला ताब्यात घेतले होते. प्रमुख संशयित असलेले श्रावण वाघमारे (वय 25, रा. भिवापूर) व प्रशांत जांभूळकर (रा. तास, ता. भिवापूर) हे तेथून पसार झाले होते. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर चिमूर तालुक्यातील साठगाव येथून श्रावण व प्रशांत यांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान ईश्वरसिंग यानेच श्रावणची भेट गोपालसिंग याच्याशी करून दिल्याचे समोर आले होते. सेंट्रल जेलमधून 4 फेब्रुवारी 2015ला त्याला ताब्यात घेतले. तो एका गुन्ह्यामध्ये तेथील कारागृहात होता. 7 फेब्रुवारी 2015 ला ईश्वरसिंग यास वनविभागाने चिकमारा येथून अटक केली. बिबट कातडी तस्करी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 12 फेब्रुवारी 2015 पर्यंत न्यायालयाने या दोघांना वनकोठडी सुनावली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 6 जणांना अटक झाली असून आणखी काहींचा सहभाग यात राहू शकतो, अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.