शेतकऱ्यांत निराशा : लाल्याचा उत्पादनावर
परिणाम
सकाळ वृत्तसेवा
हिंगणा, ता. 3 : खरिप हंगाम 2014-15मध्ये कापसावर लाल्या रोगाचा प्रभाव झाला. सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील यंत्रणांना दुष्काळग्रस्त गावाच्या सर्वेक्षणाचे शासनाकडून आदेश आले नाहीत. या आदेशाची शासनाकडून प्रतीक्षाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
हिंगणा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 69521.61 हेक्टर आहे. यावर्षी खरीप हंगामात 24,501 हेक्टर क्षेत्रात कापूस, सोयाबीन, 5,543 तर, तूर 3,729 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पाच नोव्हेंबरपर्यंत तालुक्यात 758.6 मिमी. पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उपलब्ध पाण्याच्या स्रोतावर शेतकऱ्यांनी पिके जगविली. मात्र, कापसाचे बिटी बियाणे अधिकाधिक शेतकऱ्यांनी लावले. रासायनिक खतांचा वापर केला. मात्र, जमिनीत ओलावा नसल्याचा त्याचा लाभ पिकाला झाला नाही. परिणामी लाल्या रोगाने पीक प्रभावित झाले. 12 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकावर लाल्याचा प्रकोप झाला. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे.
सोयाबीन पिकाच्या शेंगा हंगाम संपूनही भरला नाही. बियाण्यांचा पेरणीचा खर्च पाहता शेतातील सोयाबीन काढणे परवडण्यासारखे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पूर्ण पीकच गुरांच्या हवाली केले आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. विदर्भ, मराठवड्यातील काही भागातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करून 50पैशापेक्षा कमी आणेवारी काढली. मात्र, हिंगणा तालुक्यात दुष्काळ असतानाही सर्वेक्षण न झाल्याने खंत व्यक्त होत आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांची बोळवण
हिंगणा विधानसभाक्षेत्रातही काही गावांत दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. कापूस व सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे त्वरित सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने द्यावे, अशी मागणी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी केली आहे.

0 comments:
Post a Comment