4 Dec 2014

पहिल्या पाच उमेदवारांचे मताधिक्‍य

नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील
1. रामटेक
1) डी. मल्लीकार्जून रेड्डी- भाजप- 59343
2)आशिष जयस्वाल - शिवसेना- 47262
3) सुबोध मोहिते- कॉंग्रेस- 35546
4) योगेश वाडिभस्मे- मनसे - 2343
5) डॉ. अमोल देशमुख- राष्ट्रवादी- 9162
--------------------------------
2. सावनेर
1) सुनील केदार- कॉंग्रेस - 84630
2) विनोद जिवतोडे- शिवसेना- 75421
3) सुरेश डोंगेरे- बहूजन समाज पक्ष- 11097
4) प्रमोद ढोले- मनसे- 1042
5) किशोर चौधरी- राष्ट्रवादी- 6139
--------------------------------
3. उमरेड
1) सुधीर पारवे- भाजप- 92399
2) रुक्षदास बनसोड- बसप- 34077
3) राजू पारवे- 23497
4) रमेश फुले- राष्ट्रवादी- 2747
5) जगन्नाथ अभ्यंकर- शिवसेना- 7180
-------------------------------
4. कामठी
1) चंद्रशेखर बावनकुळे- भाजप - 126755
2) राजेंद्र मूळक - कॉंग्रेस - 86753
3) महेंद्र लोधी- राष्ट्रवादी - 752
4) तापेश्‍वर वैद्य- शिवसेना - 12791
5) नंदा गजभिये- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया - 802
-------------------------------
5. काटोल
1) डॉ. आशिष देशमुख- भाजप- 70344
2) अनिल देशमुख - राष्ट्रवादी कॉंग्रेस - 64787
3) दिनेश ठाकरे - कॉंग्रेस 4779
4) राजेंद्र हरणे - शिवसेना - 13649
5) राहूल देशमुख - शेकाप -9589
------------------------------------
6. हिंगणा
1) समीर मेघे- भाजप - 84139
2) रमेशचंद्र बंग - राष्ट्रवादी 60981
3) कुंदा राऊत - कॉंग्रेस 20573
4) भदन्त महापंत - बसप 19450
5) प्रकाश जाधव - शिवसेना 6997
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
64 टक्के मतदारांनी नोंदले 95 उमेदवारांचे भाग्य
11 लाख चार हजार 504 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूर, ता. 15 : ग्रामीण जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातून सरासरी 64 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून रिंगणातील 95 उमेदवारांचे भाग्य यंत्रामध्ये बंद केले. येत्या 19 रोजी या सर्व उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होत आहे. हिंगणा, काटोल, मौदा, उमरेड, रामटेक, सावनेर येथे मतमोजणी होईल.
जिल्ह्यात सकाळपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे सर्वत्र 11 वाजेनंतरच मतदानाला जोर आला. नागपूर जिल्ह्यात एकूण 17 लाख 31 हजार 304 मतदार संख्या आहे. यातील 11 लाख चार हजार 504 मतदारांनी मतदान केले. सायंकाळअखेर त्याची टक्केवारी 64 इतकी होती. जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारात राजेंद्र मुळक, अनिल देशमुख, रमेशचंद्र बंग, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, सुबोध मोहिते, सुनील केदार, अमोल देशमुख, यांचा समावेश आहे.
----------------------
मतदार संघ.......केंद्र.......मतदार.........मतदानकर्ते.......टक्केवारी
काटोल...........326....250536.....177881..........71
सावनेर...........347.....269952........164671........61
हिंगणा...........365......302811........193799........64
उमरेड..........386........283922.......178871.........63
कामठी..........497.......376877........226126.........60
रामटेक.........357.......247206..........163156........66
एकूण....... 2278 ....17 लाख 31 हजार 304........11 लाख चार हजार 504.....64
--------------------------------------------------------------
रामटेक
मतदार संघात सकाळपासूनच पावसाचा परिणाम जाणवला. त्यामुळे मतदारांना 10 वाजेपर्यंत घराबाहेर पडता आले नाही. दुपारी 11 नंतर मतदारांनी मतदानाला सुरवात केली. मतदान संपतेवेळी सायंकाळी मतदानाची टक्केवारी वाढली. काही ठिकाणी सायंकाळी उशिरा रांगा लागल्याने सात वाजेपर्यंत वीजदिव्यांच्या प्रकाशात प्रक्रिया सुरू होती. शिवणी (भोंडकी) मतदान केंद्राच्या परिसरात घोटाभर पाणी साचले होते. त्यामुळे मतदारांची गैरसोय झाली. रामटेक विधानसभा क्षेत्रात 357 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यात दोन हजार 176 कर्मचाऱ्यांनी आपला हक्क बजावला. खिंडशी जलाशयाच्या पलिकडे असलेल्या पंचाळा येथील मतदान केंद्रावर महिला व पुरुषांनी दुपारी साडेतीन नंतर रांगा केल्या होत्या.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates