"बॅंक ऑफ बडोदा'च्या शाखेतील कर्मचाऱ्यांमुळे ग्राहक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मौदा, ता. 4 ः येथील बॅंक ऑफ बडोदा येथील कर्मचाऱ्यांमुळे ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. शाखा व्यवस्थापक अनिलकुमार यांचे कर्मचाऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे शाखा व्यवस्थापकाची मौदा शाखेतून बदली करण्याची मागणी मौदा नगरपंचायतचे अध्यक्ष उमेश गभणे यांनी पत्रकातून केली आहे.
या शाखेद्वारे ग्राहकांना कर्ज देताना योग्य मार्गदर्शन तसेच कपातीसंबंधी माहिती दिली जात नाही. ग्राहकांना पूर्वसूचना न देता त्यांच्या इतर खात्यांतील रकमेची परस्पर कपात करण्याचा प्रकार या शाखेत घडला आहे. उमेश गभणे यांनी सदर शाखेतून 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. कर्जाचे हप्ते नियमित भरण्यात येत असतानासुद्धा दोन दिवसांपूर्वी त्याच बॅंकेत खातेदार असलेल्या गभणे यांच्या पत्नी पुष्पा गभणे यांच्या वैयक्तिक खात्यातून 71 हजार रुपये पूर्वसूचना न देता गभणे यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले. गभणे यांनी याबाबत शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता, मशीनमुळे ते पैसे चुकीचे वळते करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 1 डिसेंबर 2014 ला उमेश गभणे यासंदर्भात आपणास
भेटायचे आहे, असे भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता शाखेत नाही, असे सांगण्यत आले. परंतु, प्रत्यक्ष शाखेत गेले असता व्यवस्थापक बॅंकेतच होते.
तालुक्यातील पीककर्जाची रक्कम या शाखेत जमा करण्यात आली असून तीसुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. तसेच बरेचदा बॅंक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली जात नसल्याचा आरोप गभणे यांनी केला. त्यामुळे या शाखा व्यवस्थापकाला त्वरित हटविण्यात यावे, अन्यथा शाखेसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा गभणे यांनी पत्रकातून दिला.

0 comments:
Post a Comment