नागनदीने गिळंकृत केले तीर्थक्षेत्र, बचावासाठी लवकरच "लोक'जूट
राजेश प्रायकर ः सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 25 ः आपली थोडीशी
बेपर्वाई किती अनर्थ ओढवू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आताचे आंभोरा.
नैसर्गिकरीत्या सौंदर्याची खाण असलेले हे तीर्थक्षेत्र डोळ्यादेखत लयाला जात आहे.
नागनदीच्या प्रदूषणामुळे येथील पर्यटन, धार्मिक महत्त्व, अर्थव्यवस्था सर्वांनाच
फटका बसला आहे. तीर्थक्षेत्र बकाल झाले आहे. हे तीर्थक्षेत्र वाचविण्यासाठी
नागनदीची स्वच्छता युद्ध स्तरावर होण्याची गरज आहे.
आंभोरा या श्रीक्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होण्यापूर्वीच नागनदीच्या प्रदूषित पाण्याने हा परिसरच काळवंडला. नागनदीचे प्रदूषित पाणी कन्हानला मिळाल्यानंतर येथे जमा होत आहे. त्यामुळे एकेकाळी विरंगुळ्यासाठी नव्हे तर कुटुंबीयातील मृत सदस्याच्या पिंडदानासाठी आंभोरा नागपूरकरांची पसंती होती. परंतु नागपूरकरांनीच प्रदूषित केलेल्या नागनदीचे पाणी येथे जमा होत असल्याने नागपूरकरांना पिंडदानासह सहलीसाठीही वेगळी वाट धरावी लागत आहे. आंभोऱ्याच्या महत्त्वाची जाणीव नागपूकरांना करून देण्याची गरज आता पर्यटन तसेच पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.

पाच नद्यांचा संगम दूषित
मध्य प्रदेशातून आलेली कन्हान, उमरेडवरून आलेली आम आणि
भंडाऱ्यावरून आलेल्या वैनगंगेसह मुरझा व कोलारी या पाच नद्यांच्या संगमामुळे आंभोरा
या गावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु कन्हानला सावंगी मोठी येथे नागनदीने
प्रदूषणाच्या विळख्यात घेतल्याने हा पाच नद्यांचा संगम प्रदूषित झाला.
नागपूरकरांच्या सांडपाण्याने शहराचा भूगर्भातील जलसाठा प्रदूषित केलाच, शिवाय पाच
नद्यांच्या पाण्याला दूषित केल्याने गंभीर परिणाम पुढे आले आहेत.
श्राद्ध, पिंडदानालाही ना
हिंदू संस्कृतीत कुटुंबीयातील मृत सदस्याचे
परंपरेनुसार वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी श्राद्ध किंवा पिंडदान केले जाते. आंभोराही
असेच एक ठिकाण असून आता दूषित पाण्यामुळे अंत्यविधीची परंपराही अनेकांनी मोडीत
काढल्याचे येथील जिल्हा परिषद सदस्य मनोज तितरमारे यांनी सांगितले. पिंडदानापूर्वी
अंघोळीसाठी नदीत योग्य पाणी नसल्याने अनेकांनी आंभोऱ्याकडे पाठ फिरविली.
दुकाने ओस, मासेमारीही नाही
श्राद्ध, पिंडदानामुळे येणाऱ्या नागरिकांसाठी पूजन सामग्रीची अनेक दुकाने होती. परंतु, आता ही दुकाने ओस पडली आहे. याशिवाय येथील मासेमारी हा प्रमुख व्यवसायही मोडीत निघाला. पर्यटकांसाठी उघडलेल्या हॉटेल्समध्ये केवळ गावकरीच चहाचा फुरका मारताना दिसून येतात. त्यामुळे या गावासह पंचक्रोशीतील अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
पर्यटकांचीही पाठ
नागपूरपासून केवळ 60 किमी असल्याने येथे रविवारी नागपूरकरांसह इतर अनेक पर्यटक येत होते. परंतु, येथे काळ्या पाण्याचा साठा पाहायला कुणीही येत नाही. एकप्रकारे नागपूकरांनीच विरंगुळ्याचे एक चांगले स्थळ नष्ट केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पाणी वाढल्याने नावेतून येथील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठीही कुणी फिरकत नसल्याचे दिसून येत आहे.

नागनदीच्या प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्नरत आहे. नागनदीला पिवळी व पोरा नदीही मिळते. त्यामुळे नागनदीसह या दोन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांशिवाय निमशासकीय संस्थांचीही या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी मदत घेतली जाणार आहे.
-प्रवीण दटके, महापौर
स्नान केले तर सुटते खाज
आंभोऱ्यात पाच नदीच्या संगमावर धरण बांधण्यात आले. परंतु, या धरणातील पाणी प्रदूषित असल्याने पिंडदानापूर्वी अंघोळीस कुणी गेल्यास शरीराला खाज सुटते. त्यामुळे नागरिकांचे येणे पिंडदानाचे प्रमाण घटले. येथील मासे प्रसिद्ध होते. परंतु, आता स्थानिक नागरिक येथील मासे खरेदी करीत नाही. अनेक हॉटेल्स बंद पडल्याने स्थानिकांचा व्यवसायही बुडाला.
-अरुण भोयर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कुही-मांढळ.
नागनदीच्या स्वच्छतेचे काम केवळ महापालिकेचे नसून येथील नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. नागनदीच्या प्रदूषित पाण्याचा एवढ्या मोठ्या गावांना फटका बसत आहे. इतरांना आपल्याकडून काहीतरी चांगलेच देण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे एक जबाबदार नागपूरकर म्हणून माझ्यासह संबंधातील सामाजिक संस्था नागनदीच्या स्वच्छतेसाठी निश्चितच पुढे येतील.
- राजू वाघ, अपघातमुक्त नागपूर शहर अभियानाचे प्रमुख