महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या नागपूर विभागातर्फे दिनांक 28 एप्रील या महाबीज वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यालय नागपूर येथे संपन्न झाला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद नागपूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री विजय घावटे यांनी भुषविले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने श्री टेंभुर्ने विभागीय बिज प्रमाणिकरण अधिकारी, नागपूर व प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ चिमुरकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हयातील बिजोत्पादक शेतकरी व महाबीज विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावणेमध्ये महाबीजचे विभागीय व्यवथापक श्री एल.एच.मेश्राम यांनी महाबीजची स्थापना 39 वर्षापुर्वी 28 एप्रील 1976 रोजी झाल्याचे संागून सुरूवातीला महाराष्ट्रातील फक्त 4 जिल्हयामध्ये बियाणे उत्पादन घेतल्या जात होते व आता संपुर्ण महाराष्ट्रामध्ये व बाहेरील राज्यामध्ये सुध्दा विवीध पिक वाणांचा बिजोत्पादन कार्यक्रम व बियाण्याचे वितरण केल्या जात असल्याचे सांगीतले. महाबीज कडून शेतक-यांकरीता वेळेपुर्वी बियाणे देण्यात येत असून बियाणे रास्त दरामध्ये व गुणवत्ता युक्त बियाण्याचा पुरवठा केल्या जाते तसेच शासनाच्या विवीध योजनेअंतर्गत अनुदानावर प्रमाणित बियाण्याचा पुरवठा केल्या जात असल्याचे आपल्या प्रस्तावणेमध्ये सांगीतले. आजच्या युगामध्ये खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये सुध्दा बियाणे वितरण प्रणालीमध्ये महाबीजने आपले स्थान टिकवुन ठेवलेले आहे व शेतक-यांच्या विश्वासास पात्र ठरलेले आहे. कृषि शास्त्रज्ञ डाॅ चिमुरकर यांनी सोयाबीन, तूर व कपाशी पिकाचे जास्त उप्तादन कसे घ्यावे व कोणते तंत्रज्ञान शेतामध्ये वापरावे याबाबत शेतकरी बांधवांना तांत्रीक मार्गदर्शन केले. श्री घावटे विभागीय कृषि सह संचालक नागपूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाबीजने यापुढे सुध्दा दर्जेदार बियाण्याचे उत्पादन घेउन महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना रास्त दरामध्ये हंगामापुर्वी विवीध पिक वाणांचे बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन श्री दिवे यांनी तर आभार प्रदर्शन श्री संजय राउत यांनी केले.



