14 Jan 2015

अरुंद वळण रस्त्यामुळे होतात अपघात


मौदा ः सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे बांधकाम करताना अनेक तांत्रिक चुका होतात. या चुका बऱ्याचदा जीवहानी व वित्तहानीस कारणीभूत ठरतात. वळणावर रस्ता अरुंद करून सुपर एलीवेशन बनविणे अत्यावश्‍यक आहे. असे असताना बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागतो.
आठवड्याभरात बाबदेव येथील साखर कारखान्यापासून एनटीपीसीच्या रेल्वे लाइनचे उड्डाणपुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झाले. साखर कारखान्याजवळील नहरालगत अगदी काटकोनात दोन वळण असून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करताना दोन्ही वळणासह रुंदीकरणासह "सुपरएलिवेशन' न बनविल्यामुळे अपघात होतात.
नुकतेच या वळणावर 0आर व1 क्‍यू 5808 हा ट्रक उलटला. त्यातील माल अस्ताव्यस्त झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. तालुक्‍यातील अनेक रस्त्यांवर वळणाच्या ठिकाणी रुंदीकरणसह "सुपरएलिवेशन' बनविण्यात न आल्याने वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडतात. हॉटेल रबडीवालाजवळील "टी पॉइंट'सुद्धा धोकादायक वळण असून वळणावर वाहनचालकांना अचूक वेध घेणे कठीण होऊन अनेक अपघात होतात. त्यामुळेसुद्धा जीवितहानी झालेली आहे. स्थानिक नेत्यांनी उड्डाणपूल बांधणीच्या मागणीसाठी आंदोलन केले. परंतु, प्रशासन या मागणीची दखल कधी घेणार, असा परिसरातील नागरिक सवाल करीत आहेत. यामार्गावरील दुभाजक सुमारे 4 वेळा तुटले. अनेक वाहनांनी धडक मारली. या अपघात अनेकांना प्राण गमवावे लागले. वाहन पार करताना कोणी धडक तर मारणार नाही ना, अशी भीती या मार्गावर लागत असते.
 
Blogger Templates