पहाटेच्या सरावादरम्यान कालव्यात फसलेल्या प्राण्यांना मदतीचा हात
शरद शहारे : सकाळ वृत्तसेवा
वेलतूर, ता. 30 : एकेकाळी वन्यजीव शिकारीसाठी प्रसिध्द असलेल्या वेलतूर जंगलातील वन्यप्राण्यांना संकट काळात जीव वाचविण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाने आदर्श निर्माण केला आहे.
देशसेवेसह अर्थाजनासाठी पोलिस, सेना, वन खात्यात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या युवकांचा हा गट आहे. सकाळी पहाटे उठून लांब अंतर धावण्याचा सराव करतात. वेलतूर सभोवताल हजारो हेक्टर झुडपी जंगल आहे. त्यात तृणभक्षी वन्यजिवासह त्यांच्या शिकारीवर जगणाऱ्या इतरही हिंस्त्रपशूंचे वास्तव्य आहे. येथील जंगलात ससे, हरिण, निलगाय, सांबर, चितळ, वाघ, डुक्कर, लांडगे, रानकुत्रे व कोल्ह्याचे आहेत. परिसरात नदी, तलाव व डोंगररांगा असल्याने प्राण्यांना मुक्तसंचार करण्यास वाव आहे.
इंदिरासागर गोसे खुर्द धरणाअंर्तगत बांधण्यात आलेल्या आंभोरा उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांच्या जाळ्यांमुळे हे क्षेत्र बाधित झाले आहे. योजनेमुळे क्षेत्राचे सिंचन स्वप्न साकार झाले असले तरी वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
धानला, शिकारपूर, चन्ना, तारोलीसह गोसेखुर्द धरणाचे मुख्य कालवेही या परिसरातून गेले आहेत. मुख्य कालव्यातून उपमुख्य कालवा आणि त्याच्या वितरिकामुळे कालव्यांचे जाळे तयार झाले आहे. रात्री चरण्यासाठी व शिकारीसाठी आपल्या अधिवासातून बाहेर पडणारे प्राणी सावजाच्या शोधात फिरत असताना कालव्यात पडतात. खोल सिमेंटच्या प्रवाही कालव्यातून त्यांना बाहेर पडणे बहूतेकदा शक्य होत नाही. परिनामी त्यांना आपला जीव गमवावा लागते. या घटनांमुळे वन्यप्रेमींची चिंता वाढली आहे. मात्र, वेलतूरच्या गुडमॉंर्निंग पथकाने त्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे. हे पथक पहाटे गटाने वेगवेगळ्या कालव्यांच्या पाळीवरुन सराव करत फसलेल्या प्राण्यांचा अदमास घेत धावत सुटतात. फसलेली प्राणी दिसल्यास त्यांना आधार देऊन बाहेर काढतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी तीन हरणांचा जिव वाचविला. अशाच एका घटनेत एका हरणाचा जिव त्यांना वाचवीता आला नाही. त्यामुळे ते निराश झाले. मात्र, भविष्यात घडणाऱ्या अशा घटनांवर आळा घालून वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येण्याचा निर्धार केला आहे. या गटात सचिन तुर्ती, श्याम चनोळे, विलास मेश्राम, विनोद कामठे, सुजीत बोरसरे, सुजीत डेंगे, मयुर फरांडे, गोलू तुर्ती, आशिष बाभरे यांच्यासह गावातील काही तरुणांचा समावेश आहे. त्यांना वेलतूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोंदके, पोलिस कॉस्टेबल सर्वेश बेलकर, चाचेरकर यांचेही सहकार्य लाभत आहे.