कळमेश्वर पालिका प्रशासनाविरोधात
शहरवासींमध्ये तीव्र असंतोष
सकाळ वृत्तसेवा
कळमेश्वर, ता. 4 ः येथील पालिका हद्दीतील मालमत्ता करात 20 टक्क्यांची वाढ सुधारित आकारणी नोटीसद्वारे घराघरांत पोहोचल्यावर पालिका प्रशासनाच्या विरोधात शहरवासींत प्रचंड असंतोष पसरला. ही वाढ डोईजड होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उद्या 5 डिसेंबरला आपले म्हणणे मांडण्याकरिता आक्षेप घेतलेल्या नागरिकांना पाचारण करण्यात आले आहे. या वेळी नागरिकांनी घर करवाढीसंदर्भात आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन जनजागृती कृती समितीने केले. वाढीव कर कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
दर चार वर्षांनंतर नगररचना विभागाच्या वतीने घरांचे पुनर्मूल्यांकन करण्यात येते. या वर्षी पालिकेने फेरमूल्यांकनाकरिता ऑगस्टमध्ये आपल्या मालमत्तेची माहिती मागविण्याकरिता फार्म भरून घेतले होते. त्या माहितीच्या आधारे गेल्या 15 दिवसांपासून वाढीव घरकराची सुधारित वाढीव आकारणी विशेष नोटीस करासह पाठविल्याने नागरिकांत प्रचंड खळबळ माजली आहे. यापूर्वी 2010 मध्ये भरमसाट करवृद्धी केली होती. त्यामुळे काही जाणकारांच्या मते जिल्ह्यात सर्वाधिक घरकर घेणारी पालिका ठरली आहे. आता परत 20 टक्क्यांनी वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम पालिका करीत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.
कळमेश्वरात एकूण 4 हजार 450 घरे आहेत. यांच्याकडून कर रूपात वसुली करण्यात येते. यामध्ये 3 हजार 474 निवासी घरे आहेत. यामधून पालिकेला 66 लाख 76 हजार 311 रुपये प्राप्त होतात. घरकर वाढविण्याचा अधिकार नगररचना विभागाला आहे. या वर्षी पालिकेकडून घरकराच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर घरकरात 20 टक्के वृद्धी स्पष्ट दिसत आहे. टॅक्स नोटीसच्या अन्य करांमध्ये शिक्षण कर, वृक्ष कर, नवीन अग्निशमन कराचा समावेश आहे. अशा परिस्थितीत 1 हजाराच्या मालमत्ता करावर 200 रुपये व अन्य कर 100 रुपये, असे एकूण 300 वाढणार असल्याने महागाईच्या दिवसात कळमेश्वरवासींकरिता "बुरे दिन' येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसामान्य माणूस पै-पै जमवून जिवाचा आटापिटा करून निवासाची व्यवस्था व्हावी, याकरिता एखादा भूखंड घेतो. इकडून तिकडून कर्ज घेऊन घर बांधतो. यानंतर कराच्या रूपात आणखी एक समस्या उभी राहते.
नगररचना विभागाने करवाढीसंदर्भात नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन इतर पालिकेच्या तुलनेत अगोदरच जास्त घरकर असल्याने कुठल्याच प्रकारचा घरकर वाढवू नये. वृद्धी झाल्यास पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. या वर्षी तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता ही वृद्धी योग्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.

0 comments:
Post a Comment