रवी राजुलवार - मो 9623440719
राज्यात चर्चित असलेल्या युग चांडक हत्याकांडाच्या तपासात राजुलवार यांची महत्त्वाची भूमिका आहे. आरोपींचा सुगावा लावणे व त्यांच्याकडून खरे घटनास्थळ दाखविण्यास भाग पाडले. चांडक कुटुंबीयांना धीर देऊन आरोपींचा धागा उकलण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच युग हत्याकांडातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली. याची दखल आयुक्तासह पोलिस महासंचालकांनी घेतली आणि त्यांचा सत्कार केला. भरचौकात झालेल्या पिंकू घोंगडे हत्याकांडात किचकट तपास असताना आरोपींचा पाठलाग करीत चौघांना शस्त्रासह अटक केली. तर चंद्रमनी गार्डनजवळ झालेल्या चव्हाण हत्याकांडात चार तासांत आरोपींना अटक केली. गणेशपेठ बसस्थानक चौकात झालेल्या सूरज जयस्वाल हत्याकांडात गणेशपेठ व गुन्हे शाखा पोलिसांना आरोपी सापडत नव्हते. त्यांनी लकडगंजमध्ये तैनात असलेल्या रवी राजुलवार यांची मदत घेतली. त्यांनी चोवीस तासांत आठ आरोपींना बेड्या ठोकल्या. तीन चेनस्नॅचर्सकडून 21 गुन्ह्यांची उकल व 16 लाखांचे दागिने त्यांनी जप्त केले. पत्नी अवंती यांनी जीवनाच्या प्रत्येक चढउतारावर साथ दिल्याने आजही अविरत कर्तव्य करीत असल्याचे राजुलवार सांगतात.
कुख्यात गुंडांच्या सर्वाधिक टोळ्या अजनीत होत्या. त्यामुळे गुन्हेगारांचा गड म्हणून अजनीची ओळख होती. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक रवी राजुलवार यांची अजनी पोलिस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत गुन्हेगारांवर वचक बसविला. अनेक टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत दरारा निर्माण केला. गुन्हेगारांवर सर्वाधिक एमपीडीएच्या कारवाया करण्यास राजुलवार यांनी सुरुवात केली. त्यांच्या कारवायांमुळे अनेक गुंडांनी अजनीतून पळ काढला, तर काहींनी गुन्हेगारी सोडली.रवी गोपालराव राजुलवार हे मूळचे वाशीम जिल्ह्याचे. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय. एकुलता एक मुलगा असल्यामुळे आई मंगलाबाई यांची मुलाने शिक्षक व्हावे, अशी इच्छा. मात्र, घरची आर्थिक स्थिती पाहता त्यांनी पारंपरिक व्यवसाय करण्याचे ठरविले. रवी यांना कुश्तीचे वेड होते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेताना कुश्तीमध्ये विद्यापीठाकडून "कलरकोट' मिळाला. तर दिल्लीमध्ये आरडी परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. पदवी झाल्यानंतर एमपीएससीच्या अभ्यासाकडे वळले. जिद्दीमुळे ते एमपीएससीत मेरिटमध्ये आले आणि पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. नागपूर शहरात पोस्टिंग मिळाली तीही अजनीसारख्या पोलिस ठाण्यात. त्यावेळी अजनीत चिंतलवार गॅंग, गिजऱ्या गॅंग, तिवारी गॅंग, माया गॅंग, रोहित रामटेके गॅंग, विक्की पसेरकर गॅंग, लोहकरे गॅंग, विक्की ठाकूर गॅंग, बब्बन गॅंग, जोगी गॅंग, धम्मा गॅंग, आशीष टकल्या गॅंग, गब्बर सहारे गॅंग व खोब्रागडे गॅंगचा बोलबाला होता. रुजू होताच काही दिवसांतच टोळीयुद्ध भडकले. त्यामुळे गॅंगचे कंबरडे मोडण्याचा निर्धार केला. जनसंपर्क वाढविला आणि काही युवकांना हाताशी धरले. गिजऱ्याची भरचौकातून "वरात' काढून एमपीडीएची कारवाई केली. त्यामुळे अन्य टोळ्यांत भीती निर्माण झाली. त्यानंतर टोळ्यांचा सफाया करण्याची मोहीम हाती घेतली. काही अडचणींचा सामना करून गॅंगवार कल्चरला फाटा दिला.