जलालखेडा (जि. नागपूर), ता. 2 : मोवाड फाटा येथून जाणाऱ्या जीपमधून 75 हजार 280 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणी रोशन हरिराम बुरडे (वय 23), रा. जलालखेडा यास अटक करण्यात आली.
जलालखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी नाकाबंदी करीत असताना रोशन बुरडे (वय 23) हा जीप (क्र. एमएच-40/वाय 3161)मधून राज्यात प्रतिबंधित असलेले विविध कंपन्यांचे सुंगधित तंबाखू घेऊन जात असताना सापडला. जीपमध्ये 75 हजार 280 रुपयांचा तंखाबू होता. पोलिसांनी वाहनासह एकूण 3,25,280 रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक पी. व्ही. जाधव, पोलिस उपनिरीक्षक कोरडे, सहायक फौजदार जाधव, पोलिस हवालदार दिलीप इंगळे, पोलिस शिपाई ठाकूर, किशोर लोधी, चालक कळंबे यांनी केली.




0 comments:
Post a Comment