14 Aug 2017



आज दिवसभरातील बातम्यांवर एक नजर

आज दिवसभरातील बातम्यांवर एक नजर - 14/08/2017

  • - घाटंजी तालुक्‍याच्या चोरंबा येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणात सात जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यवतमाळच्या जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला.
  • - गडचिरोलीतील 12 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर झाले. यामध्ये एक तत्कालीन पोलिस अधीक्षक, 4 उपनिरीक्षक, 1 सहायक उपनिरीक्षक, 2 हवालदार आणि 4 शिपायांची समावेश आहेत. या शिपायांपैकी 2 शहीद झाले आहेत.
  • - यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना नक्षलवादी चळवळीविरोधात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलिस शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
  • - नागपूर येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील कांढळी गावाजवळील ही घटना घडली. अपघातात 33 प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत.
  • - विदर्भाचे माजी रणजीपटू व वेगवान गोलंदाज भास्कर ऊर्फ लाडूभाऊ जोशी यांचे निधन झाले. वर्धा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल.
  • - अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक 14 उमेदवारांचे 7 सप्टेंबरला निवड समितीसमोर सादरीकरण होणार आहे.
  • - आर्णी तालुक्‍यातील उमरी पठार येथील तरुण शेतकरी अभिजित पुरणसिंग राठोड (वय 26) याने रविवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
  • - विदर्भात ठिकठिकाणी आज शेतकरी कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन
  • - नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित "वंदेमारतम' महापौर चषक स्पर्धेचा समारोप थाटात झाला. विविध गटात झालेल्या या स्पर्धेत विविध गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आउट, साउथ प्वॉईंट स्कूल ओंकारनगर आणि मुंडले इंग्लिश स्कूल हे महापौर चषकाचे मानकरी ठरले.
  • - नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग,चिल्डन ट्रॅफिक पार्कसह सर्व उद्यानात उद्या 15 ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांना नि:शुल्क प्रवेश मिळणार आहे

कर्जमाफीच्या जीआरची होळी

जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने संविधान चौकात चक्का जाम, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, कर्जमाफीच्या जीआर ची केली होळी
 
Blogger Templates