6 Sept 2016

मॉर्निंग वॉकवर गेलेल्या वृद्धावर गोळीबार

नागपूर ः मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 72 वर्षीय वृद्धावर अज्ञात आरोपींनी बेछुट गोळीबार केला. या गोळीबारा वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सीए रोडवरील अग्रेसन भवन चौकात घडली. एकनाथ धर्माजी निमगडे (सी.ए. रोड) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे वृद्धाच्या सुरक्षेवर आणि पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एकनाथ निमगडे यांची वर्धा रोडवर भूखंड आहे. त्याच्या खरेदी-विक्रीचा वाद सुरू गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. याच वादातून त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला. चार गोळ्या त्यांना लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस सहआयुक्‍त आणि पोलिस उपायुक्‍तांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates