नरेंद्र हिवरे
मो. 9823815100
...................
नागपूर ः नक्षलवाद हा सध्या कळीचा मुद्दा आहे. नक्षलवादी शहराकडे घुसू पाहत असताना पहिल्यांदा "स्लिपर सेल'ला अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केली होती. पहिल्यांदा जयंत मडावी या स्लिपर सेलला कोतवालीतून त्यांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तुल, रायफल आणि बुलेट जप्त केल्या होत्या. त्यानंतर आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आले. नक्षल विरोधी पथकात असताना त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात खबऱ्यांचे जाळे विणले होते. त्याच बळावर नक्षल्यांच्या अनेक कारवाई उधळून लावल्या होत्या हे विशेष.
नरेंद्र कृष्णराव हिवरे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील पवनार या खेड्यातील. वडील पोलिस खात्यात सहउपनिरीक्षक होते. तर काका सहायक पोलिस आयुक्त. मुलाने प्राध्यापक व्हावे, अशी वडीलांची इच्छा. त्यामुळे नागपुरातून कृषी पदवीचे शिक्षण घेतले. नोकरीच्या शोधात असताना नरेंद्र यांनी पोलिस अधिकारी व्हावे, अशी मोठा भाऊ प्रवीण हिवरे यांची इच्छा. त्यामुळे 1992 ला एमपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पीएसआय म्हणून निवड. त्यांनी एमबीए, एलएलबी आणि पत्रकारितेची पदवी घेतली. त्यामुळे त्यांची इंग्रजीसह चार भाषेवर कमांड आहे. त्यांच्या 22 वर्षाच्या सेवाकाळात 135 रिवार्ड आहेत. उच्चशिक्षित असलेल्या पत्नी संध्या यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे मुलगा कौस्तुभ आयआयटी खडकपुरला शिक्षण घेत आहे. ते सध्या गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.
खापा येथे 2003 मध्ये "ट्रीपल मर्डर' झाला होता. आठ महिन्यांपर्यंत हत्याकांडाचा धागाही नव्हता. नरेंद्र हिवरे रूजू झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांतच ट्रीपल मर्डरचा पर्दाफाश करून आरोपींना अटक केली. या कामगिरीची दखल खुद्द पोलिस महासंचालकांनी घेतली. त्यांना "बेस्ट डिटेक्शन अवार्ड' त्यांना प्रदान करण्यात आला. संवेदनशिल असणारे अपहरण प्रकरणे हाताळण्यात ते "मास्टर' आहेत. नंदनवनमध्ये चुना व्यापारी यांचा दीड वर्षाचा मुलगा पार्थ कैकाडे याचे मुकेश बांतेच्या टोळीने अपहरण करून 60 लाखांची खंडणी मागितली होती. हिवरे यांनी 12 तासांत आरोपीला अटक करून बाळाला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले होते. व्यापाऱ्याचा मुलगा हितेश पुरोहित याचे लकी खानने अपहरण केले होते. हे प्रकरण अतिषय कसोसीने हाताळत मुलाला सुखरूप यवतमाळमधून तर आरोपींना अकोल्यातून ताब्यात घेतले होते. 2011 मध्ये राज्य पोलिस ड्युटी मिट स्पर्धेत त्यांनी "फॉरेन्सीक सायन्स' या विषयात सुवर्णपदक तर "मेडीको लिगल टेस्ट'मध्ये सिल्वर पदक मिळवले होते. अँटी करप्शन ब्युरोमध्ये असताना 16 शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी अटक केली होती. शहरात कोणताही व्हीआयपी व्यक्ती आल्यास बेशिस्त असलेली वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी हिवरे यांच्यावर देण्यात येते. गणपती विसर्जन आणि दुर्गोत्सव, ईद आणि दसरा यावेळी निघणाऱ्या रॅली-मिरवणूकींच्या रस्त्यांचे नियोजन अजुनही हिवरे करतात. वाहतूक शाखेत असताना एकाच दिवशी सर्वाधिक 2606 हेल्मेट कारवाई तर 2135 सीटबेल्टे कारवाई केल्या. हे राज्यातील कारवाईचे रेकॉर्ड आहे. हिवरे यांना महाराष्ट्रदिनी पोलिस महासंचालकाचे बोधचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600
andykamble1@gmail.com

0 comments:
Post a Comment