तपासाची शैली, क्षमता आणि गुणवत्तेच्या बळावर सीबीआयमध्ये पोलिस विभागातून अधिकाऱ्यांची निवड केल्या जाते. त्याच कसोटीवर खऱ्या उतरलेल्या गुन्हे शाखेतील अधिकारी प्रदीप लांडे यांची सीबीआयमध्ये निवड झाली. सीबीआयमध्ये असताना बेधडक कारवायांमुळे त्यांचा नाव लौकीक होता. रेल्वे भरती स्कॅम ते मिलीट्री भरती घोटाळ्यापर्यंत लांडे यांनी उघडकीस आणून शासकीय विभागातील बोगस भरतीवर प्रतिबंध घातला होता, हे विशेष. त्यांना आतापर्यंत 140 वर रिवार्ड आणि एकाच महिन्यात 23 गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल त्यांची "पोलिस मानकरी' पुरस्कारासाठी निवड झाली होती.
प्रदीप रामनाथजी लांडे हे मूळचे मौदा तालुक्यातील शिंगोरी या गावातील. वडील पोलिस खात्यात सहनिरीक्षक असल्यामुळे वर्दीचे आकर्षन. बारावीची परीक्षा झाल्यानंतर लगेच भरतीची तयारी. 1994 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षीय खाकी वर्दी अंगावर चढली. दरम्यान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एलएलबीची पदवी घेतली. मुलगा अधिकारी व्हावा, अशी आई आशाताई यांची इच्छा. त्यामुळे लांडे यांनी 2004 मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली. पास झाल्यानंतर पीएसआय म्हणून निवड. बास्केटबॉलपटू असल्याने पोलिस क्लबचा बास्केटबॉल संघ तयार करून पोलिस राज्यस्तर स्पर्धेत सहभाग. नंदनवनमधील गुरूदेव क्रीडा मंडळात अजुनही ते कोच म्हणून सेवा देतात. अंबाझरी ठाण्यात असताना झोन वन स्क्वॉडची जबाबदारी मिळाली. पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रित ठेवून पथकाचा दरारा निर्माण केला होता. याची दखल आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी घेतली होती. 2009 मध्ये सीबीआयमध्ये त्यांची निवड झाली होती. विशेष कामगिरीसाठी सीबीआयचे महासंचालकांनी लांडे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला होता. पांढरपेशी गुन्हेगारांची टोळी 2013 मध्ये मिलीटरीमध्ये बोगस भरती करणार होती. आर्मी भरतीच्या लेखी परीक्षेत "रनिंग ट्रॅप' करून कोट्यवधीचा स्कॅम उघडकीस आणून 5 आरोपींना अटक केली. 2012 मध्ये रेल्वे विभागात बनावट प्रमाणपत्र आणि दस्तावेजाद्वारे बोगस भरती सुरू होती. प्रदीप लांडे यांनी छापा घालून भरती करणाऱ्या टोळीतील 5 जणांना बेड्या ठोकल्या. खामगावमधील डॉ. देशमुख यांना इंकम टॅक्स उघडकीस न करण्यासाठी 70 लाखांची डीमांड करणाऱ्या आयकर अधिकारी व अकोल्यातील राजू जयस्वाल यांना रंगेहात पकडले. राज्यभर गाजत असलेल्या "डब्बा ट्रेडींग'च्या तपासात त्यांची महत्वाची भूमिका आहे. तसेच विदर्भ बॉटलर्सवर त्यांनी छापे घालून 17 कोटींचे घबाड बाहेर काढले होते. तसेच टीम्बर मर्चंट असोसिएशनचा अपहारसुद्धा लांडे यांनीच बाहेर काढला होता. 2008 मध्ये अंबाझरीतील डॉ ढुमे यांचा सात वर्षाचा मुलगा स्वानंद याचे ट्युशन क्लासमधून चौघांनी अपहरण केले होते. त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा आवळला होता. या प्रकरणाचा आठ तासात छडा लावला व चौघांना अटक केली. सोनेगावमध्ये सोने विकणाऱ्या टोळीवर छापा घालणाऱ्या तोतया पोलिसांचा छडा त्यांनी लावला. यामध्ये सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मडावीला त्यांनी बेड्या ठोकल्या होत्या. पत्नी मेघा यांनी जीवनाच्या प्रत्येक "दौर'मध्ये साथ दिल्यामुळे यशस्वी वाटचाल असल्याचे लांडे सांगतात.
- अनिल कांबळे
Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600
andykamble1@gmail.com

0 comments:
Post a Comment