सोनाली दुबे
मो. 9021186671
नागपूर- पोलिस खात्यात हार्डवर्कला महत्व आहेच. परंतु त्याला जर स्मार्टवर्कची जोड असल्यास कामाची दखल घेतली जाते. वाहतूक पोलिस विभागात अशाच प्रकारचे काम पोलिस शिपायी सोनाली दुबे करीत आहे. व्हेरायटी चौकात कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिस बूथमधील लाऊडस्पिकर मृदू आणि गोड आवाजात अनाऊन्सींग ती करीत असते. झेब्रा क्रॉसिंगवरून चाला, स्टॉपलाईनच्या मागे थांबा अशा सूचना ती वाहनचालकांना आणि पायी चालणाऱ्यांना देत असते. तिच्या या कार्याची दखल पोलिस आयुक्त व उपायुक्तांनी घेतली. तिला पूर्व शाखेचे पोलिस निरीक्षकांकडून रिवार्डसुद्धा जाहीर केला.
सोनाली मानसिंग दुबे (गड्डीगोदाम) या नागपूर पोलिस दलात दक्षिण वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्याचे वडील सेंट्रल वेअरहाऊस कार्पोरेशनमधील नोकरीतून सेवानिवृत्त झाले. सोनाली यांनी शाळेत असताना रस्ता सुरक्षा दलात (रोड सेफटी पॅट्रोल) सहभाग घेतला. 26 जानेवारीला झालेल्या पथसंचलनाचे प्लाटून कमांडंट म्हणून नेतृत्व त्यांनी केले. त्यामुळे वर्दीचे आकर्षन निर्माण झाले. मुलीने शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी आई गंगाबाईची इच्छा. त्यामुळे अकरावीत असतानाच पोलिस भरतीची तयारी सुरू. पूजा याकर या मैत्रिणीसह पहाटे चार वाजताच सायकलने पोलिस लाईनच्या मैदानावर पोहचून प्रॅक्टिस. 2008 बारावी पास होताच पोलिस भरती दिली आणि लगेच निवड झाली. वयाच्या 19व्या वर्षी खाकी वर्दी अंगावर चढली. पाचपावली,लकडगंज आणि कोतवाली पोलिसांच्या गस्तीपथकांत समावेश. दरम्यान महिला कैद्यांना कारागृहात नेणे तसेच हॉस्पिटल-न्यायालयात नेण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. ऍडर्व्हटाईजींग कंपनीत नोकरीला असलेले पती लाजरस अँथोनी यांनी सोनाली यांना सुख-दुःखात साथ दिली. तर सासू सुनीता आणि सासरे जेस्सी अँथोनी यांनी आई-वडीलांप्रमाणे प्रेम दिले. त्यांचे पाठबळ आणि पती लाजरस व मैत्रिण असलेली ननंद नवीना यांच्या प्रेरणेने पोलिस दलात वाटचाल सुरू आहे. जुलै 2015 मध्ये वाहतूक दक्षिण शाखेत रूजू झाल्यात. नेतृत्वगूण आणि कामाची क्षमता पाहता सोनालीला नेहमी गजबजलेल्या व्हेरायटी चौकात तैनाती देण्यात आली. तेथे लाऊडस्पिकरमधून सुमधूर आवाजातअनाउन्सींग करतात. वृद्धांना रस्ता क्रॉस करून देण्यासाठी तत्पर असतात. ऑटोचालकांना नियंत्रित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. "रस्ता सुरक्षा सप्ताह'मध्ये डीसीपी भारत तांगडे यांनी वाहतूक विभागाच्या प्रचार-प्रसार आणि जनजागृतींमध्ये सोनालीला महत्वाची जबाबदारी दिली होती. कस्तुरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात सोनाली यांनी हेल्मेट घालून रॅम्पावॉक केला होता. एप्रिलमध्ये व्हेरायटी चौकात दोन युवती दुचाकीने चौक पार करीत होत्या. दरम्यान युवकाच्या दुचाकीचा कट लागून अपघात झाला. दोन्ही मुली गंभीर जखमी अवस्थेत पडल्या. सोनाली यांनी दोघींनाही मदत करीत त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या नातेवाईकांना सूचना दिली. त्यांचे हॉस्पिटलचा खर्चसुद्धा सोनालीने केला. पोलिस दलातील वाहतूक शाखेच्या उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील आणि आयपीएस दीपाली मासिरकर या सोनाली यांच्या आदर्श आहेत.
- अनिल कांबळे
Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600
andykamble1@gmail.com

0 comments:
Post a Comment