हेमंतकुमार खराबे
मो. 9923438355
............
मो. 9923438355
............
खापरखेड्यात 2008 मध्ये साफसफाईसाठी गडरमध्ये दोन मजूर उतरले. गडरमधील विषारी गॅसमुळे ते बेशुद्ध पडले. त्यांना वाचविण्यासाठी अभियंताही गडरमध्ये उतरला आणि तोसुद्धा बेशुद्ध पडला. ही माहिती मिळताच खापरखेड्याचे ठाणेदार असलेले हेमंतकुमार खराबे घटनास्थळी पोहचले. दरम्यान, अग्निशमन दलही पोहचले. मात्र, धोका लक्षात घेता त्यांनी गडरमध्ये उतरण्यास नकार दिला. त्यामुळे खराबे यांनी वर्दीसह गडरमध्ये घुसून दोघांना बाहेर काढले. तर अभियंत्याला काढल्यानंतर तेसुद्धा बेशुद्ध पडले. या घटनेत तिघांचेही प्राण वाचविण्यात खराबे यांना यश मिळाले. या वृत्ताची दखल राज्यभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली. बेशुद्ध पडलेल्या खराबे यांच्यावर सहा दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरू होता. दरम्यान, त्यांची पंतप्रधान जीवनरक्षा पदकासाठी निवड झाली. जीवनरक्षा या पदकाचे मानकरी असलेले खराबे एकमेव पोलिस अधिकारी आहेत. सीबीआय आणि पोलिस दलात आतापर्यंत त्यांना एकूण 193 रिवार्ड आहेत तर 82 प्रशस्तीपत्र आहेत. 2012 मध्ये पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता. पोलिस विभागात विशेष व उल्लेखनिय कार्य केल्यामुळे त्यांना 2003 मध्ये "महासंचालक विशेष सेवा पदक' मिळाले आहे.
हेमंतकुमार केवलरामजी खराबे हे मूळचे लाखनी तालुक्यातील मानेगाव खेड्यातील. वडील शिक्षक तर आई लक्ष्मी या शेतमजूर. नागपुरातून बी.एस्सी (ऍग्री) शिक्षण पूर्ण करताच विद्यापिठात फिल्ड असिस्टंट नोकरी मिळाली. त्यानंतर रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून नोकरी मिळाली. तर महसूल विभागात ग्रामविकास अधिकारी (व्हीडीओ) तसेच फॉरेस्ट विभागात नोकरी केली. 1993 ला एमपीएससी दिली आणि पीएसआय म्हणून निवड. गुणवत्ता लक्षात घेता अधिक्षकांनी खराबे यांना प्रोबेशनरी असतानाच देवळीचे ठाणेदार बनविले. गोंदियातील चिचगढमध्ये असताना नक्षलवाद्यांशी चारदा चकमक केली. अंधाधुंद फायरिंग सुरू असतानासुद्धा दोन नक्षल्यांना जीवंत पकडले. त्यावेळी "खराबे तुझे जल्दी उडायेंगे' अशी पोस्टर्स नक्षल्यांनी गावात लावली होती. त्यानंतरही खराबे यांनी अनेक नक्षल्यांचे मन परीवर्तन करून शरणागती पत्करण्यास भाग पाडले. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्या तैनात कमांडो-60 या पथकाची निर्मिती खराबे यांनी केली. खापरखेड्यातून पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये फोन जात होते. त्यांनी इंटरनॅशनल कॉल रॅकेट पकडून शासनाचे कोट्यवधीचे नुकसान टाळले. सीबीआयमध्ये असताना डिफेन्समध्ये बोगस भरती घोटाळा, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला कर चोरी घोटाळा, रेल्वेत बोगस भरती घोटाळा आणि एकाच दिवशी रेल्वेच्या तीन उच्च अधिकाऱ्यांना अटक करण्याची कामगिरी त्यांनी केली. खराबे यांना लाच देण्याऱ्या डॉक्टर आणि त्याच्या साळ्याला स्वतःच्या घरात सापळा रचून अटक केली. चिमूरमध्ये त्यांनी रेशन घोटाळा उघडकीस आणून तहसीलदाराला अटक केली होती. चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्षाला जुगार खेळताना त्यांनी अटक केली होती. ब्रम्हपुरीतील जमीन घोटाळ्यात नगरपरीषदेचे सीईओ, एसडीओ, इंजिनिअर आणि नगरसेवक असे एकूण 57 जणांना अटक केली होती. पत्नी माया यांनी कौटूंबिक जबाबदारी सांभाळल्यामुळे रेणू, साची आणि ओम हे तिघेही शिक्षणात पुढे जात आहेत. सध्या ते हिंगण्याचे ठाणेदार आहेत.
-अनिल कांबळे
Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600
andykamble1@gmail.com

0 comments:
Post a Comment