मिथीलेश त्रिपाठी'
नागपूर पोलिस दलातील एकमेव "एन्काऊंटर स्पेशालिस्ट' म्हणून ओळखल्या जाणारा खमक्या पोलिस अधिकारी म्हणून मिथीलेश त्रिपाठी यांची ओळख. त्यांनी नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या तीन आतंकवाद्यांना "कंठस्नान' घातले तर अनेक राज्यांना "वॉंटेड' असलेला कुख्यात डाकू अंग्रेजसिंगला अगदी सहा फुटावरून गोळ्या घालून ठार केले. या दोन्ही कामगिरीसह अनेक थरारक घटनांचे साक्षिदार मिथिलेश त्रिपाठी आहेत.मिथीलेश त्रिपाठी यांच्या संघर्षमय जिवनाची पोलिस अधिकाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, अशी कामगिरी त्यांच्या नावावर दर्ज आहे. देशसेवेचे व्रत घेऊन पोलिस 1982 मध्ये पोलिस दलात दाखल झाले. पिस्तुल आणि मिथीलेश यांची नेहमीची सांगळ. पोलिस दलात स्पेशल स्क्वॉडमध्ये त्यांची नेमणूक. त्यामुळे पोलिस आयुक्त आणि महासंचालकांशी थेट संपर्क. जून 2007 मध्ये मिथीलेश हे रात्रगस्तीवर होते. संघ मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी पोलिसांच्या वेशात तीन आतंकवादी कारने आले. त्यावेळी मिथीलेश हे बडकस चौकात कर्तव्य बजावत होते. आतंकवाद्यांची गाडी संघ मुख्यालयाकडे वळताच मिथीलेश यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेच चालकाला त्या कारचा पाठलाग करण्यास सांगितले. त्या कारच्या पाठोपाठ पोलिसांचे वाहन पोहचले. आतंकवाद्यांनी कारमधून उतरताच बेछुट गोळीबार सुरू केला होता. मिथीलेश यांनी प्राणाची बाजी लावून आतंकवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिले. मिथीलेश यांच्या पहिल्याच गोळीत एक आतंकवादी ठार झाला. त्यांनी वायरलेसवरून स्टॉफ बोलावला. पथकाचे नेतृत्व करीत तीनही आंतकवाद्यांना यमसदनी धाडले. गोळीबारात जखमी झालेल्या एका सहकारी पोलिस अधिकाऱ्याला स्वतः मेडीकल हॉस्पिटलमध्ये पोहचून त्याचेही प्राण वाचवले.
उत्तराखंडचा कुख्यात दरोडेखोर अंग्रेससिंगचा शोध अनेक राज्याचे पोलिस घेत होते. त्याच्या शोधासाठी जुलै 2007 मध्ये हरीद्वार पोलिस नागपुरात आले. त्यांनी मिथीलेश त्रिपाठी यांच्या पथकाची मदत मागितली. सीए रोडवरील स्कायलार्क हॉटेलमध्ये अंग्रेजसिंग अत्याधुनिक शस्त्रासह लपलेला असल्याची माहिती मिळाली. मिथीलेश यांनी स्वतः नेतृत्व करीत हातात पिस्तुल घेऊन हॉटेलमध्ये घुसले. हॉटेलमध्ये अंग्रेजसिंग, त्याच्या दोन पत्नी, मुलगा आणि भाऊ लपलेला होता. मिथीलेश यांनी प्लान आखला. त्यानुसार सर्व पोलिसांनी सापळा रचला. अंग्रेजसींगला कुणकुण लागताच त्याने पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला. वरच्या माळ्यावर दबा धरून बसलेल्या मिथीलेश यांनी अंग्रेजसिंगच्या अंगावर झेप घेऊन सहा फुटाच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. काही क्षणातच अंग्रेजसिंगला जमीनीवर लोळवले. नायझेरियन सशस्त्र असलेला गुन्हेगार ओकाका गोडवीन याला मुंबईत भरचौकात पिस्तुल डोक्यावर लावून अटक केली. तर नागपुरात लपून बसलेल्या 140 बांगलादेशी घुसखोरांच्या हातात बेड्या ठोकल्या. 2006 मध्ये मंत्री रत्नकला बलराज यांच्या घरावरील दरोड्याचा मिथीलेश यांनी शोध लावून आरोपी अटक केले. एलआयसी चौकात शस्त्रसाठ्याने भरलेली कार त्यांनी पकडली होती