बाजीराव पोवार
मो. 8805159100
..............................
लहान मुलांचे अपहरण झाले किंवा मुलगा घरातून निघून गेल्यानंतर आई-वडीलांची काय स्थिती होते, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र, हरविलेल्या किंवा निघून गेलेल्या मुलांचा शोध घेणारा "बापमाणूस' पोलिस अधिकारी म्हणून बाजीराव पोवार यांना ओळखले जाते. पोवार यांनी राज्यसरकारच्या महत्वाकांशी "ऑपरेशन मुस्कान' या अभियानात महत्वाची भूमिका निभावली. त्यांनी सर्वाधिक मुले-मुलींचा शोध घेऊन नागपूर पोलिस आयुक्तालयाला द्वितीय स्थान मिळवून दिले. त्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे आज अनेक आईवडीलांच्या चेहऱ्यावंर "मुस्कान' आणि "स्माईल' कायम आहे.
बाजीराव महादेव पवार हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील वाघवे खेड्यातील. वडील पन्हाळा पंचायत समितीमध्ये लेखापाल तर आई शालाताई गृहिणी. त्यांनी इंग्रजी या विषयात एमए केले. पोवार हे व्हॉलीबॉल खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठ संघाचे कर्णधार असताना तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियनशिप त्यांनी मिळवून दिली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये साखर कारखान्यात वेलफेअर ऑफिसर म्हणून काम केले. त्यानंतर मालवन येथे एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट अधिकारी होते. पोवार यांचे पाच वर्गमित्रांची पीएसआय म्हणून निवड झाली होती. त्यांची वर्दी पाहून राज्यसेवा परीक्षेची तयारी केली. 1993 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पीएसआय म्हणून निवड. पहिलीच पोस्टींग मुंबईच्या जागेश्वरी पोलिस ठाण्यात. रूजू झाल्याच्या आठ दिवसानंतरच बाबरी मश्जिद प्रकरणामुळे राधाबाई चाळ येथे हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगळ उसळली. त्यामुळै तीन दिवसांपर्यंत अथक तैनाती होती. या कार्याची आयुक्तांनी दखल घेत रिवार्ड जाहीर केला होता.
कुख्यात दरोडेखोर चड्डी बनियान टोळीचा म्होरक्या आबा शिंदे याचे 2006 मध्ये मुंबई पोलिसांना आव्हान होते. त्याच्यावर 11 खून, 19 दरोडे, 48 घरफोड्या दाखल होत्या. त्याला पोवार यांच्या पथकाने उस्मानाबादमधून अटक केली होती. आबासह 12 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. तामिलनाडूमध्ये राजराज रघुनाथ पिल्लई हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर 412 गुन्हे दाखल होते तर चारवेळा पोलिसांनावर गोळीबार केला होता. त्याला पवार यांनी सापळा रचून पनवेलमधून अटक केली होती. पोवार यांना आतापर्यंत 121 रिवार्ड आणि 59 प्रशस्तीपत्र मिळाले आहेत. पोलिस आयुक्त एस.पी. यादव यांनी "मुस्कान' आणि "स्माईल' या दोन्ही अभियानाची धुरा पोवार यांच्याकडे दिली. ऑपरेशन मुस्कानमध्ये 611 जणांचा शोध घेतला. तर "स्माईल' अभियानांत 608 जणांचा शोध घेऊन पुन्हा नागपुरला प्रथम क्रमांक मिळवून दिला. तिसऱ्या अभियानात 254 जणांचा शोध घेतला. गुन्हे शाखेच्या एसएसबीचे प्रमुख असताना "सेक्स रॅकेट'ला टार्गेट करीत देहव्यापाराच्या दलदलीत फसलेलया दीडशेवर मुलींची सुटका केली. राज्यात सर्वाधिक सिलींग कारवाई त्यांनी केली आहे. सध्या ते पोलिस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांचे रिडर आहेत. कर्तव्यात अनेक चढऊतारांचा सामना करावा लागला परंतु पत्नी संध्या यांनी मोलाची साथ दिल्याचे पोवार सांगतात.
- अनिल कांबळे
Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600
andykamble1@gmail.com

0 comments:
Post a Comment