- अनिल कांबळे
मंगळवार, 2 ऑगस्ट
हत्याकांड किंवा अपहरण प्रकरणाचे तपास किचकट असतात. धागा पकडून आरोपींच्या मुळापर्यंत पोहोचावे लागते. तपासात कुठेही त्रुटी राहिल्यास त्याचा फायदा आरोपीला होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन इन्फॉर्मेशन ऍण्ड टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून अनेक किचकट तपासाचा उलगडा करणारा अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांना ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक कठीण असलेल्या प्रकरणांचा टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून छडा लावला. सुरेंद्रगढच्या नववीच्या विद्यार्थिनीला स्कूलबसचालक मनीष राऊत (रा. हजारीपहाड) याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे वडील बॅंकेत मॅनेजर आहेत हे हेरून तिचे 22 जूनला 2016 ला अपहरण केले. गोंदियात खोलीत डांबले. तिच्यावर पाच दिवस अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास जितेंद्र बोबडे यांनी केला. शाळा ते घरापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज, बसस्थानक आणि रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही, मोबाईलचे टॉवर लोकेशन, तिच्या मैत्रिणीचे फोन आणि साक्षीदार यांचा काहीसा मेळ लावला. मुलगी गोंदियात असल्याची टीप मिळाली. गोंदिया शहर पिंजून काढले. तिची सुटका केली. आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याची दखल सीपी शारदाप्रसाद यादव यांनी घेऊन कौतुक केले.
जितेंद्र बोबडे हे मूळचे भडगाव-बुलडाण्याचे. वडील पीटी शिक्षक असल्यामुळे घरी शिस्तीचे वातावरण होते. मुलाने शिक्षक व्हावे, अशी वडिलांची इच्छा. त्यामुळे बोबडे यांनी मराठी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि बी.एड्च्या तयारीत होते. बास्केटबॉल या खेळात अमरावती विद्यापीठाचे नेतृत्व केले, तर हॅण्डबॉलमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा गाजवली. मात्र, कॉलेजमध्ये एनसीसीची वर्दी अंगावर चढल्यानंतर पोलिस खात्यात जाण्याची तळमळ वडिलांकडे बोलून दाखवली. शेवटी 2008 मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस विभागात दाखल झाले. मुलाला पोलिसाच्या वर्दीत पाहून आई दमयंती यांचा आनंद गगनात मावेनासे झाला. संरक्षण सेवेची आवड असलेल्या करुणा यांच्याशी विवाह झाला. करुणा राज्य कारागृह प्रशासनात नोकरी करतात. त्यांना पहिलीच पोस्टिंग कोतवाली ठाण्यात मिळाली.
दुसऱ्या एका प्रकरणात तिघींचा दादला असलेल्या देवानंद रघटाटे या बिल्डरने दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीचा खून केला. तिचा मृतदेह व्याळाकडे असलेल्या जंगलात नेऊन जाळला. कोतवालीत केवळ मिसिंग दाखल झाली. 40 दिवसांनंतर खून झाल्याचे निष्पन्न करून बोबडे यांनी धागादोरा नसतानाही आरोपीसह दोघांना अटक केली. दाभ्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. या हत्याकांडात केवळ आयटीच्या मदतीने दोन तासांत आरोपींना अटक केली. नागपूर जेलमध्ये चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या अयाज शेख या कैद्याने मेडिकल हॉस्पिटलमधून पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. बोबडे यांनी त्याला नेटवर्कच्या बळावर दाभ्यातून अटक केली. दाभा नाक्यावर ट्रकचालकाचा खून झाला. ट्रकमध्ये असलेल्या जीपीएसवरून ट्रकचा शोध घेतला. टेक्निकल तपासात लूटमार करून चालकाचा खून करणाऱ्या टोळीला त्यांनी अटक केली. पागलखाना चौकात पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीचा खून केला. महिलेच्या घराची झडती घेताच विम्याचे पैसे मिळविण्यासाठी हत्या केल्याचे त्यांनी उघडकीस आणले. आतापर्यंत त्यांना 20 पेक्षा जास्त रिवॉर्ड मिळाले. ते सध्या गिट्टीखदान पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

0 comments:
Post a Comment