11 May 2016

आई माझी कविता

आई माझी कविता

आत्मा आणि ईश्‍वर यांचा 
मिलाफ असते आई,
तीच गुलाब तीच मोगरा, 

तीच जाईजुई
- सानिका सुनील सारवे,
मनीषनगर, नागपूर.
------------------ 

ऋणानुबंधाचे धरणीवर
वसलेलं एक गाव...
माझ्या मनातील या गावाला...
"आई' असे नाव...

- रुचिका कोसे

नात्यांची दोरी नाजुक असते
डोळ्यातील भाव ही हृदयाची भाषा असते.
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबांकडे असते...

- श्रुती धनेंद्र नवलाखे,
शांतीनगर कॉलनी, साईनगर, नागपूर

------------------
एका अनाथ आई नसलेल्या मुलीची हाक!
जन्मा घालूनी मजला
तू सोडून गेली आई
ही रातकिड्यांची साथ
मज कुठवर घेऊन जाई!

- सरिता

---------
कसली आली दिवाळी
अन्‌ कसला आला दसरा
आई तुझ्याविना गं राहीन
कसा मी हसरा

- नवीन पाटील

-------------
आई मायाळू झाड
निरंतर सावली
पदरात तिच्या
निवते काहिली

- जयश्री दाणी
------------
देव शोधू मी कशाला
देवाच्या देव्हाऱ्यात
साक्षात देवाला पाहिले
मी आईच्या रूपात

- अमोल प्र. भोयर
-----------
पाहता रूप तुझे आई
मन भारावून हे जाते,
गावकुस सोडताना गं
व्याकूळ होऊन रडते.

- प्रमोद जा.चांदेकर

-------
आई तुला काय म्हणावे, तू फुलांची कोमलता,
नभाची विशालता, गंगेची निर्मलता, चंदनाची शीतलता,
दिव्य सागराची अनंतता आणि माझी एकता म्हणजेच आई
-प्रणव यशवंत कोठे

-------------------

आई तूच माझं मंदिर
तुझीच मूर्ती या हृदयात
सांज, सकाळ, दुपार
जीव ओतला तुझ्या चरणात

- ब्रह्मानंद गणपत मुळे
बुटीबोरी

-----------
एक सुंदरशी कळी
फुलविते आई,
यापुढे जाणार नाही बळी,
याची काळजी घेईल,
घरातील प्रत्येक बाई.
- सोनू आमने

त्रिमूर्तीनगर, नागपूर
---------------

मुलगा म्हणाला
आई दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही,
वडील म्हणाले दिव्याची वात लहान कर मला झोप लागत नाही,
आई रात्रभर दिव्याची वात कमी-जास्त करत राहिली
आणि आयुष्यभर दोघांमध्येच वातीसारखी जळत राहिली.

- शीतल गहूकर 

 
Blogger Templates