आज दिवसभरातील बातम्यांवर एक नजर - 14/08/2017
- - घाटंजी तालुक्याच्या चोरंबा येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणात सात जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यवतमाळच्या जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला.
- - गडचिरोलीतील 12 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर झाले. यामध्ये एक तत्कालीन पोलिस अधीक्षक, 4 उपनिरीक्षक, 1 सहायक उपनिरीक्षक, 2 हवालदार आणि 4 शिपायांची समावेश आहेत. या शिपायांपैकी 2 शहीद झाले आहेत.
- - यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना नक्षलवादी चळवळीविरोधात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलिस शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
- - नागपूर येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कांढळी गावाजवळील ही घटना घडली. अपघातात 33 प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत.
- - विदर्भाचे माजी रणजीपटू व वेगवान गोलंदाज भास्कर ऊर्फ लाडूभाऊ जोशी यांचे निधन झाले. वर्धा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल.
- - अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक 14 उमेदवारांचे 7 सप्टेंबरला निवड समितीसमोर सादरीकरण होणार आहे.
- - आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथील तरुण शेतकरी अभिजित पुरणसिंग राठोड (वय 26) याने रविवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
- - विदर्भात ठिकठिकाणी आज शेतकरी कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन
- - नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित "वंदेमारतम' महापौर चषक स्पर्धेचा समारोप थाटात झाला. विविध गटात झालेल्या या स्पर्धेत विविध गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आउट, साउथ प्वॉईंट स्कूल ओंकारनगर आणि मुंडले इंग्लिश स्कूल हे महापौर चषकाचे मानकरी ठरले.
- - नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग,चिल्डन ट्रॅफिक पार्कसह सर्व उद्यानात उद्या 15 ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांना नि:शुल्क प्रवेश मिळणार आहे
0 comments:
Post a Comment