मनपाच्या
आवाहनाला प्रतिसाद
कमी किमतीत उत्कृष्ट सुविधेच्या संकल्पनेला मिळणार रोख पुरस्कार
नागपूर- लोकसहभागातून 'स्मार्ट सिटी'साठी नागपूरकरांनी महापालिकेवर अक्षरशः सूचना, संकल्पनांचा पाऊस पाडल्याचे चित्र आहे. आज शेवटच्या दिवशी रात्री पावणे दहा वाजेपर्यंत झोन तसेच मनपाच्या केंद्रीय कार्यालयातील बॉक्समधून 1108 नागरिकांच्या सूचना, संकल्पनांची नोंद महापालिकेने केली. उशीरा रात्रीपर्यंत संकल्पनाची मोजणी सुरू होती तसेच इ-मेलद्वारेही तीनशेवर नागरिकांनी प्रतिसाद दिला असून नागरिकांचा आकडा दीड हजारावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्मार्ट सिटी अभियानात केंद्र सरकारने लोकभावनेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. शहर कसे असावे, याबाबत स्थानिक नागरिकांकडून मते मागविण्याचे स्मार्ट सिटी मार्गदर्शक तत्त्वात नमुद आहे. त्यानुसार महापालिकेने 12 ऑगस्टपासून स्मार्ट सिटीसाठी नागरिकांकडून सूचना, संकल्पना आमंत्रित केल्या होत्या. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता महापालिकेने दोनदा मुदतवाढ दिली. संकल्पना, सूचना मागविण्याचा आज शेवटचा दिवस होता. रात्री पावणे दहावाजेपर्यंत झोन, केंद्रीय कार्यालयातील बॉक्समधून 1008 संकल्पना, सूचना आल्याची माहिती अतिरिक्त उपायुक्त दांडेगावकर यांनी दिली. आणखी काही बॉक्स अद्याप उघडायचे असून उशीरा रात्रीपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. याशिवाय www.smartcitynagpur.com या संकेतस्थळावरही तीनशेवर नागरिकांनी संकल्पना मांडल्या असल्याचे समजते. महापालिकेने पॅन सिटी तसेच एखाद्या भागाचा विकास या दोन मुद्द्यांवर संकल्पना मागविल्या होत्या. आलेल्या संकल्पनांतून उत्कृष्ट 20 संकल्पनांची निवड तज्ज्ञांद्वारे केली जाणार आहे. यातून उत्तम दहा संकल्पनाची निवड केली जाणार आहे. उत्तम दहा संकल्पना मांडणाऱ्यांना स्मार्ट सिटीचे ब्रॅंड अँबेसेडर करण्यात येणार आहे. दहापैकी कमी खर्चात उत्कृष्ट सुविधेच्या एका संकल्पनेला रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.

दहा ब्रॅंन्ड अँबेसेडर करणार झोनमध्ये सादरीकरण
उत्तम दहा संकल्पना मांडणाऱ्यांना महापालिका स्मार्ट सिटीचे ब्रॅंड अँबेसेडर करणार आहे. हे दहा ब्रॅंड अँबेसेडर महापालिकेच्या दहाही झोनमध्ये स्मार्ट सिटीच्या त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करणार आहेत. सध्या दहाही झोनमध्ये स्मार्ट सिटीबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. दहा ब्रॅंड अँबेसेडर शहराच्या विविध भागात स्मार्ट सिटीबाबत थेट नागरिकांसोबतही संवाद साधतील.